News Flash

जयललिता यांच्यावर दुसरा बायोपिक; ‘ही’ अभिनेत्री करणार मुख्य भूमिका

जयललिता यांच्या आयुष्यावर सहा बायोपिक काढण्यात येणार

जयललिता यांच्यावर दुसरा बायोपिक; ‘ही’ अभिनेत्री करणार मुख्य भूमिका
जयललिता

अभिनेत्री कंगाना रणौतचा ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून कंगनाने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या चित्रपटाच्या यशानंतर तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या असून त्यामध्ये तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरही बायोपिक ‘जया’ हा चित्रपट देखील असल्याचे म्हटले जात होते. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय करणार आहेत. पण आता जयललिता यांच्या आयुष्यावर आणखी एक चित्रपट काढण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दिग्दर्शक केथीरेड्डी जगदीस्वरा रेड्डी देखील तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरही बायोपिक काढणार आहेत. तसेच या चित्रपटाचे नाव ‘शशिललिता’ असणार असल्याचेही म्हटले जाते. या चित्रपटात जयललिता यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री काजल देवगणची निवड करण्यात आली असून जयललिता यांच्या विश्वासू सहकारी शशिकला यांची भूमिका अमला पॉल साकारणार असल्याची चर्चा सुरू आहे. काजोल आणि अमला यांच्या कडून या बाबात कोणत्याही प्रकारचा दुजोरा देण्यात आलेला नाही.

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर सहा बायोपिक काढण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच दिग्दर्शक प्रियदर्शिनी ‘आयर्न लेडी’ या नावाने बायोपिक काढणार आहे. या बायोपिकमध्ये नित्या मेनन जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. याव्यतिरिक्त राम गोपाल वर्मा आणि भारथीराजाने देखील जयललिता यांच्यावर बायोपिक काढण्याची घोषणा केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2019 6:08 pm

Web Title: kajol and amala paul to play jayalalithaa and sasikala in another biopic
Next Stories
1 ‘कबीर सिंग’च्या टीझरवर ‘बाहुबली’ फिदा
2 राजकारणात उतरण्याचे सारा अली खानकडून संकेत
3 ‘H2O’च्या कलाकारांचे पडद्यामागील श्रमदान
Just Now!
X