News Flash

“सलमानला खरंच कलाकार म्हणावं का?”; Wikipedia पेज पोस्ट करुन अभिनेत्याने उडवली खिल्ली

अभिनेत्याने पुन्हा एकदा साधला सलमानवर निशाणा

अभिनेता कमाल आर खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर निशाणा साधला आहे. त्याने सलमानच्या Wikipedia पेजचे काही स्क्रीन शॉट पोस्ट करुन त्याची खिल्ली उडवली आहे.

सलमान खान बॉलिवूडमधील वादग्रस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर आजवर अनेक कायदेशीर खटले देखील दाखल करण्यात आले आहेत. या खटल्यांचे संदर्भ त्याच्या विकिपिडिया पेजवर देखील पाहायला मिळतात. या पेजचे काही स्क्रिन शॉट पोस्ट करुन कमाल खानने सलमानची खिल्ली उडवली आहे. “सल्लूचं हे Wikipedia पेज पाहा याला अभिनेता म्हणावं की….” अशा आशयाचं ट्विट केआरकेनं केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

गेल्या काही काळात कमाल सातत्याने सलमानवर टीका करत आहे. “संपूर्ण जगाला माहिती आहे सलमानने विवेक, जॉन आणि अर्जित यांच्यासोबत काय केलं. आता सोनू निगम, साहिल खान आणि इतर कलाकार त्याच्यावर आरोप करत आहेत. हा निव्वळ योगायोग नाही. सलमानने नक्कीच यांच्यासोबत काही तरी केलं आहे. उगाचच कोणी त्याच्यावर आरोप करत नाही.” यापूर्वी त्याने अशा आशयाचे ट्विट करुन सलमानवर निशाणा साधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 5:32 pm

Web Title: kamaal r khan criticises on salman khan over wikipedia page mppg 94
Next Stories
1 Video: डान्स करता करता शाहरुखने केले काजोलला किस, व्हिडीओ व्हायरल
2 अभिनेत्यावर आली भाजी विकण्याची वेळ, व्हिडीओ व्हायरल
3 शत्रूघ्न सिन्हा यांचा करण जोहरला पाठिंबा, म्हणाले…
Just Now!
X