News Flash

कंगना रणौतला ‘गोपी बहु’चा पाठिंबा; म्हणाली…

पाहा, कंगनाविषयी देवोलिना नेमकं काय म्हणाली

बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई केली. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यात अनेकांनी बीएमसीवर टीका केली आहे. तर काहींनी कंगनाची पाठराखण केली आहे. यामध्येच गोपी बहू म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचर्जी हिने प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाच्या अनुपस्थितीमध्ये तिच्या कार्यालयावर कारवाई केल्यामुळे देवोलिनाने नाराजी व्यक्त केली आहे. तिने ट्विट करत तिचं मत मांडलं आहे. सोबतच कंगनाच्या कार्यालयाचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. मणिकर्णिका फिल्म्सच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केल्यानंतर त्याचे काही फोटो कंगनाने शेअर केले होते. तिचं हेच ट्विट देवोलिनाने रिट्विट केलं आहे. त्यावर तिने


देवोलीनाने अपने ट्विटर एकाउंट पर कंगना के एक पोस्ट रीट्वीट किया है, ‘Sad sad sad.. खरंच #deathofdemocracy’, असं कॅप्शन दिलं आहे. तसंच एका मुलाखतीत तिने या विषयी तिचं मतही मांडलं आहे.

“एक सतत प्रकाशझोतात राहणारी व्यक्ती असं बेकायदेशीररित्या बांधकाम करेल असं वाटत नाही. तसंच त्यांच्याकडे कार्यालयाची बांधणी करण्यापूर्वी बीएमसीच्या परवानगीचे कागदपत्रदेखील असल्याचं तिने सांगितलं आहे. मात्र तरीदेखील तिच्याकडचे कागदपत्र पाहण्यापूर्वीच केलेली ही कारवाई चुकीची आहे”, असंही देवोलिनाने मुलाखतीत सांगितलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 2:12 pm

Web Title: kangana ranaut office building demolished by bmc gopi bahu actress devoleena bhattacharjee reacts ssj 93
Next Stories
1 कंगनाला BMC ने दिली होम क्वारंटाइनमधून सूट; कारण…
2 “रियाचा इतका द्वेष का करतेस?”; शिबानी दांडेकरचा अंकिताला सवाल
3 प्रसिद्ध रॅपर रफ्तार करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X