देशभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. विविध क्षेत्रातील कलाकार, राजकारणी, खेळाडू आपापल्या शैलीत देशवासीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा देत आहे. परंतु या सर्वांमध्ये इरॉस या फिल्म प्रोडक्शन कंपनीने दिलेल्या अनोख्या शुभेच्छा मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. अलिकडेच इरॉसने सलमान खान, रणबीर कपूर, कतरिना कैफ अशा विविध कलाकारांचे फोटो पोस्ट करुन देशवासीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांचे हे फोटो अभिनेत्री कंगना रणौतला आवडलेले नाहीत. अश्लिल फोटो पोस्ट करणं गरजेचं आहे का? असा सवाल करत तिने इरॉरवर जोरदार टिका केली आहे.
अवश्य पाहा – ‘भाजपाला मत द्या अन्यथा लस मिळणार नाही?’; भाजपाच्या जाहिरनाम्यावर दिग्दर्शकाचा सवाल
We must preserve cinema as a community viewing theatre experience,its more difficult to enthrall large section of audience than sexualise content for personal viewing, digitisation of art faces this major crisis, all streaming platforms are nothing but a porn hub. SHAME @ErosNow pic.twitter.com/qKHde2R4HI
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 22, 2020
अवश्य पाहा – ‘घरात १० दिवस बंद राहून पाहा मग कळेल’; ‘बिग बॉस’ स्पर्धक ट्रोलर्सवर संतापली
कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशापासून देशातील राजकारणापर्यंत विविध विषयांवर ती रोखठोक मतं मांडते. यावेळी तिने इरॉस कंपनीवर निशाणा साधला आहे. “आपण चित्रपटांना सामुहिकरित्या थिएटरमध्ये पाहिलं जाणारं माध्यम म्हणून संरक्षित केलं पाहिजे. परंतु काही जणांचा चित्रपटांना वैयक्तिक माध्यम करण्याकडे अधिक कल आहे. ही मंडळी चित्रपटांमार्फत अश्लिलतेला प्रोत्साहन देत आहेत. इरॉससारखे काही स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म सध्या पॉर्नहब सारखा कॉन्टेंट देत आहेत.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
एरॉसने काय पोस्ट शेअर केल्या आहेत ?
शनिवारपासून नवरात्र सणाला सुरुवात झाली असून तेव्हापासून एरॉस आपल्या कंपनीकडून निर्मित चित्रपटांमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. यामध्ये दीपिका पदुकोनचा ‘बाजीराव मस्तानी’मधील तर करिना कपूरचा Ra.One चित्रपटातील फोटोंचा समावेश आहे. पण यावेळी कंपनीने कतरिनाचा पिवळ्या साडीतील फोटो शेअर करताना लिहिलेल्या पोस्टवरुन हा वाद सुरु झाला आहे.