News Flash

“माझी चप्पल आणा”, यामी गौतमच्या फोटोवर ‘राधे माँ’ म्हणणाऱ्या विक्रांत मेस्सीला कंगनाचं उत्तर

तर अभिनेता विक्रात मेस्सीच्या कमेंटवर उत्तर देत कंगना त्याला झुरळ म्हणाली आहे.

(photo-instagram/yamigautam/vikrantmassey/kanganaranaut)

बॉलिवूड अभिनेत्री गामी गौतमने ४ जूनला दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्नगाठ बांधली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये यामीचा लग्न सोहळा पार पडला. यामीने तिच्या लग्न सोहळ्यासोबतच लग्नाच्या विविध विधींचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामीचे हे सुंदर फोटो पाहून चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनी तिच्या फोटोला पसंती देत यामीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात यामीने शेअर केलेल्या काही फोटोंवर तिचे सहकलाकार अभिनेता आयुष्यमान खुराना आणि विक्रांत मेस्सी यांनी मजेशीर कमेंट करत तिची खील्ली उडवली आहे.

विक्रांत मेसी आणि आयुष्यमानने केलेल्या कमेंटवर आता बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौतने निशाणा साधला आहे. यामीने शेअर केलेल्या एका फोटोत तिने लाल रंगाची साडी परिधान केल्याचं दिसतंय. तर तिच्या हातात कलिरे आहेत. हा फोटो पाहताच आयुषमान म्हणाला, “पूर्ण जय माता दी सारखं वाटतंय.” तर अभिनेता विक्रांत मेस्सी म्हणाला, ““राधे मॉं सारखी पवित्र आणि शुद्ध दिसत आहेस.” आयुष्यमान आणि विक्रांतच्या कमेंटवर कंगनाने रील्पाय दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

हे देखील वाचा: लग्न न करताच झाली आई; टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

विक्रांत मेस्सीच्या कमेंटवर कंगना रणौत नाराज

आयुष्यमानच्या कमेंटवर कंगना म्हणाली, “हिमाचलमधील वधू सर्वात सुंदर दिसतात. देवीसारखचं त्यांच तेज दिव्य असतं” अशा आशयाची कमेंट कंगनाने केली आहे. तर अभिनेता विक्रात मेस्सीच्या कमेंटवर उत्तर देत कंगना त्याला झुरळ म्हणाली आहे. “कुठून निघाला हा झुरळ, माझी चप्पल आणा.” असं म्हणत कंगनाने विक्रांतच्या ‘राधे माँ’ चा उल्लेख करणाऱ्या कमेंटवर मात्र नाराजी दर्शवली आहे.

kangana-post-viral (photo-instagram/yamigautam)

पहा फोटो:मेहंदी ते लग्न; यामी गौतमच्या विवाह सोहळ्यातील खास क्षण

कंगनाने यामीला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

दरम्यान कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर यामी गौतमीचा एक फोटो शेअर करत तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “एका डोंगराळ भागातील मुलगी जेव्हा वधू बनते तेव्हा तिच्या इतकं सुंदर आणि तेजस्वी काहीच नाही.” अशा आशयाची पोस्ट कंगनाने यामीच्या फोटोसोबत शेअर केली आहे.

यामी गौतमच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. वेगवेगळ्या लूकमधील यामीच्या फोटोला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 10:03 am

Web Title: kangana ranaut reply vikrant massey call cockroach for his comment on yami gautam weeding look goes viral kpw 89
Next Stories
1 लग्न न करताच झाली आई; टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरबद्दल या गोष्टी माहित आहेत का?
2 लोकांच्या मदतीला धावणारा सोनू सूद स्वतः मागतोय मदत; अनाथ मुलांच्या मदतीसाठी जोडले हात
3 बॉलिवूडच्या ‘मुन्ना भाई’ने घेतली नितीन गडकरींची भेट; पायांना स्पर्श करून घेतले आशिर्वाद
Just Now!
X