News Flash

“देशद्रोही शक्ती तुमचं..”,निशाणा साधायला गेली आणि कंगना स्वत:च ट्रोल झाली

"घरात बसून ट्वीट करण सोपं आहे"

अभिनेत्री कंगना रणौत रोजच तिच्या वेगवेगळ्या ट्विटमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील घडामोडी असो किंवा देशातील, कंगना सोशल मीडियावर तिचं मत मांडत असते. मात्र अनेकदा परखडपणे मत मांडण कंगनालाच महागात पडतं. नुकतचं कंगनाने भाजपचं एक ट्विट शेअर करत सरकरावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कंगनाने केलेल्या ट्विटमुळे नेटिझन्सनी तिच्यावर पलटवार करत तिला ट्रोल केलं.

गेल्या आठवडाभरात देशात ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. एकीकडे करोनाचा वाढता उद्रेक आणि दुसरीकडे ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे आरोग्य सुविधेचा ताण वाढतोय. अशात भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देशात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे. कंगनाने भाजपचं हे ट्विट शेअर करत एक ट्विट केलं आहे. मात्र कंगनाच्या या ट्विटवरून नेटकऱ्यांनी तिलाच ट्रोल केलं.

या ट्विटमध्ये कंगना म्हणाली , ” देशद्रोही शक्ती ज्या त्यांचा वेळ संसाधन देशाला तोडण्यासाठी वाया घालवत आहेत त्या आज तुमचं मनोबल तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून सावध रहा.” असं ट्वीच कंगनाने केलंय.

भाजपने शेअर केलेल्या ट्वीटमध्ये मेदांता रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर नरेश त्रेहन यांनी रुग्णालयाकडे पुरेसा ऑक्सिजन साठा असून अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं होतं. शिवाय गरज असेल तरच ऑक्सिजनचा वापर करा असंही ते म्हणाले होते.

मात्र कंगनाच्या या ट्वीटवर एक युजर म्हणाला, ” बीजेपी कृपया यांना लवकर तिकीट द्या. आता ही एखाद्याच्या मृत्यूची थट्टा करू लागली आहे. तसचं तर ते तिचं कामच आहे, ज्याची सुरुवात सुशांतच्या मृत्यूने झाली होती. ”

तर दुसरा युजर म्हणाला आहे. “घरात बसून ट्वीट करण सोपं आहे. एकदा बाहेर येऊन पहा, परिस्थिती लक्षात येईल. तुम्हाला तर जास्तच कळेल कारण तुम्ही तर बिना मास्क फिरता”

अनेकांनी कंगनाच्या या ट्वीटनंतर तिला ट्रोल केलं आहे. ट्रोल होण्याची कंगनाची ही पहिली वेळ नाही. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसात कंगना अनेकदा ट्रोल झाली आहे. लवकरच ती ‘थलायवी’ या सिनेमात झळकणार असून या सिनेमामुळे देखील तिला ट्रोल व्हावं लागलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 11:13 am

Web Title: kangana ranaut trolled after she reacted on oxygen shortage tweet share by bjp kpw 89
Next Stories
1 काजोलच शाहरुखची पत्नी असल्याचा झाला समज; गौरीला पाहून वरुण धवन झाला होता थक्क
2 बॉलिवूडला आणखी एक धक्का; करोनामुळे अभिनेता ललित बहलचे निधन
3 वडिलांच्या सिनेमात काम करण्याची वरुणची नव्हती इच्छा, म्हणूनच त्याने…
Just Now!
X