अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता दिलजीत दोसांज या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर सुरु आहे. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधत आहे. या वादात आता गायक मिक्का सिंग याने देखील उडी घेतली आहे. आजवर २० लोकांना तरी मदत केली आहेस का? असा सवाल त्याने कंगनाला केला आहे.

अवश्य पाहा – “याला म्हणतात आत्मसन्मान”; ते दृश्य पाहून प्रकाश राज यांनी केलं शेतकऱ्यांचं कौतुक

“आम्ही दिवसाला पाच लाखांपेक्षा अधिक लोकांना जेवण देतो. तू किमान २० लोकांना तरी मदत कर. सोशल मीडियावर स्वत:ला वाघिण म्हणतेस. वाघिण होणं सोपं आहे पण दररोज लोकांना मदत करण सोप नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन मिक्कानं कंगनावर निशाणा साधला. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – VIDEO: रिअल लाईफ सुपरहिरो; अभिनेत्याने डोळ्यांवर ओतलं वितळतं मेण

अवश्य पाहा – ‘माझ्या यशाच्या आड येऊ नकोस, अन्यथा…’; एक्स बॉयफ्रेंडला पवित्राचा इशारा

शेतकरी आंदोलन: ‘त्या’ आजींविषयी ट्विट करणं कंगनाच्या अंगलट

शेतकरी आंदोलनातील एक आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून अभिनेत्री कंगना रणौतने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली आहे. त्यामुळे कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. कंगनाने अलिकडेच या आजींसदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. मात्र, त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं आहे. मात्र, सध्या ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे.