News Flash

“मोदींना नेतृत्व करता येत नाही….मोदीजी कृपया राजीनामा द्या”; कंगना रणौतचं ट्विट चर्चेत

सचिन तेंडुलकर आणि लता दीदींचा केला उल्लेख

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच ती चर्चेत असते. अनेकदा परखडपणे मत मांडण कंगनालाच महागात पडतं. गेल्या काही दिवसात कंगनाने देशीतील घडामोडींवर तिचं मत सोशल मीडियावर मांडलं. यामुळे तिला ट्रोल देखील व्हावं लागलं.

नुकतच कंगनाने एक ट्विट करत तिला वेळोवेळी ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे. यावेळी कंगनाने माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि गानसम्रानी लता दीदींचा ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणालीय, “मोदींना नेतृत्व कसं करावं हे कळत नाही, कंगनाला अभिनय करता येत नाही, सचिनला बॅटिंग कशी करावी ठाऊक नाही आणि लता दीदींना गाता येत नाही, मात्र या ट्रोलर्सना सगळं माहित आहे.” असं म्हणत कंगनाने युजर्सचा ‘चिंदी’ असा उल्लेख केला आहे. गेल्या काही दिवसात मोंदींना दोषी ठरवणाऱ्या नेटकऱ्यांना उत्तर देण्यासाठी कंगनाने हे ट्टिट केलं आहे.

पुढे कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणाली, ” मोदीजी कृपया राजीनामा द्या आणि विष्णू अवतारातील एखाद्या ट्रोलरला पुढली पंतप्रधान बनवा.” असं ती म्हणाली आहे. ट्रोल करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतल्यानंतर देखील कंगनाला नेटकऱ्यांनी पुन्हा सुनावलं आहे. एका युजरने म्हंटलं, “, “फक्त चमचेगिरी कर, देशासाठी काही मदत करू नको, किती पैसे दान केलेस तू, ट्विटरवर संताप दाखवून काही अर्थ नाही.”

तर एक युजर म्हणाला आहे, “व्वा शंभर टक्के खरं आहे. सचिन आणि लताजींबद्द्ल वगळता. त्यांचा समावेश करू नको. सचिनला क्रिकेट खेळता येतं आणि लताजींना गाता येतं. पण तू आणि मोदीची उत्तम अभिनय जाणता, आपले पंतप्रधान एक लीडर नसून उत्तम अभिनेते आहेत.” असं म्हणत युजरने कंगनाला ट्रोल केलं.

वाचा : “१२ वर्षांची असल्यापासून मी लोकांच्या ‘त्या’ कमेंट ऐकल्या”; बॉडी शेमिंगवर इलियानाने केला खुलासा
ट्रोल होण्याची कंगनाची ही पहिली वेळ नाही. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसात कंगना अनेकदा ट्रोल झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 7:20 pm

Web Title: kangana raunaut slams trolls said modi ji does not know how to lead netizens troll her kpw 89
Next Stories
1 “हे सार्वजनिक ठिकाणी करण्याचा प्रयत्न करु नका”; कार्तिक आर्यनची नवी पोस्ट चर्चेत
2 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार ‘मुंबई सागा’ चित्रपट
3 “वृत्तवाहिन्या नरेंद्र मोदी सोडून सगळ्यांच्या मुलाखती कशा घेऊ शकतात?” – राम गोपाल वर्मांचा सवाल!
Just Now!
X