News Flash

चाहत्यांच्या मागणीनंतर कपिल शर्माने शेअर केला मुलांसोबतचा फोटो

पहिल्यांदाच कपिलने मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे.

कपिलने अनायरा आणि त्रिशान या दोघांसोबतच फोटो पहिल्यांदाच शेअर केला आहे.

कॉमेडियन कपिल शर्मा हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमी चाहत्यांच्या प्रश्नांची मेजशीर अंदाजात उत्तरे देताना दिसतो. काल, फादर्स डे निमित्ताने कपिलने सोशल मीडियावर पहिल्यांदाच मुलांसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत कपिलने छान असे कॅप्शन दिले आहे.

कपिलने इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. कपिलने अनायरा आणि त्रिशान या दोघांसोबतच फोटो पहिल्यांदाच शेअर केले आहे. हा फोटो शेअर करत ‘चाहत्यांच्या मागणीनंतर अनायरा आणि त्रिशान यांचा पहिल्यांदा एकत्र फोटो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

आणखी वाचा : जाणून घ्या कपिल शर्माच्या सर्वात महागड्या ५ गोष्टी

१ फेब्रुवारी रोजी कपिल दुसऱ्यांदा बाबा झाला. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. “नमस्कार, आज सकाळी आम्हाला देवाच्या आशीर्वादाने आम्हाला मुलगा झाला आहे. ईश्वराच्या कृपेने बाळ आणि आई दोघंही चांगले आहेत. तुमचं प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभार. गिन्नी आणि कपिल” असे ट्वीट कपिलने केले होते.

कपिल बऱ्याच वेळा अनायराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. पण त्याने मुलगा त्रिशानसोबतचा फोटो शेअर केला नव्हता. फादर्स डेच्या निमित्ताने कपिलने पहिल्यांदाच दोघांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

कपिल आणि गिन्नी डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. यानंतर जुलै महिन्यात गिन्नी गर्भवती असल्याची माहिती आली होती ज्याला कपिलने दुजोरा दिला होता. आता त्यांना अनायरा आणि त्रिशान अशी दोन मुले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 10:32 am

Web Title: kapil sharma shared first photo of trishaan with anaira on public demand avb 95
Next Stories
1 मुलासाठी ३ कोटीच्या कारच्या गिफ्टवर सोनू सूदनं दिलं हे स्पष्टीकरण
2 सकारात्मक ऊर्जेसाठी योग उत्तम – अमृता खानविलकर
3 आशुतोषसोबतच्या नात्यावरुन सुरु असलेल्या चर्चेवर तेजश्री प्रधानचा खुलासा
Just Now!
X