आजवर चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. या चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. तर काही चित्रपटातून प्रेमकथा उलगडण्यात आल्या. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’. ९० च्या दशकात आलेल्या या चित्रपटाचं आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान आहे. त्यामुळे आजही हा चित्रपट तेवढ्याच आवडीने पाहिला जातो. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये बालपणीच्या अंजलीची भूमिका साकारणारी चिमुकली आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. मात्र सध्या ही अभिनेत्री काय करते किंवा आता कशी दिसते असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

शाहरुख खान, रानी मुखर्जी आणि काजोल यांच्या व्यतिरिक्त जर कोणी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली असले तर ती छोट्या अंजलीने. राहुलच्या( शाहरुख खान) मुलीची भूमिका साकारणाऱ्या या चिमुकलीचं नाव सना सईद असं असून तिने काही चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे. ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटानंतर ‘बादल’, ‘हर दिल जो प्यार करेगा’ या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. मात्र या चित्रपटांनंतर ती फारशी पडद्यावर झळकली नाही.

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
three khans conspired to get actors like Fawad Khan banned in India
फवाद खानसारख्या कलाकारांवर बंदी घालण्यासाठी कट रचला, पाकिस्तानी अभिनेत्रीचे तिन्ही खानवर गंभीर आरोप

दरम्यान, २०१२ साली चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकली. या चित्रपटात ती वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट ह्यांच्या बरोबर मुख्य भूमिकेत दिसली होती. तसंच सनाने चित्रपटांव्यतिरिक्त ‘बाबुल का आंगन छुटे ना’, ‘लो हो गायी पूजा इस घर कि’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘लाल इश्क’ या सारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर ती ‘झलक दिखला जा ६’, ‘झलक दिखला जा ७’, ‘नच बलिये ७’, ‘झलक दिखला जा ९’, ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे.