News Flash

‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी होणार करण पटेल?

जाणून घ्या सत्य

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो बिग बॉस १४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा भाईजान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता ‘ये है मोहब्बते’ या अतिशय लोकप्रिय मालिकेतील अभिनेता करण पटेल बिग बॉस १४मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता त्याच्या टीमने तो बिग बॉस १४मध्ये सहभागी होणार की नाही याबाबत माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस १४मध्ये अभिनेता करण पटेल सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता करणच्या टीमने यावर वक्तव्य केले आहे. त्यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे. करण बिग बॉस १४मध्ये सहभागी होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

Photo purani hai toh kya hua, bhai post toh naya hai na ….

A post shared by Karan Patel (@karan9198) on

करण पटेल छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘कसौटी जिंदगी की २’ मध्ये मिस्टर बजाजची भूमिका साकारत आहे. पण आता ही मालिका लवकरच बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

यापूर्वी यूट्यूबर कॅरीमिनाटी बिग बॉस १४मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्याने ट्विट करत या सर्व अफवा असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 1:08 pm

Web Title: karan patel pr team on participating in bigg boss 14
Next Stories
1 कंगनानं खरंच शिवसेनेला मतदान केलं का, नेमकं सत्य काय?
2 फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू
3 ‘तुम्ही उत्तम पालक व्हाल..’; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट
Just Now!
X