स्टाइल, दरारा आणि गावगुंडांना धाकात ठेवण्याच्या त्याच्या पद्धतीने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता पुन्हा एकदा तो म्हणजेच चुलबूल पांडे ‘दबंग ३’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘दबंग २’नंतर सात वर्षांनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत असेल हे काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले. तर आता यामध्ये अभिनेत्री करिना कपूरसुद्धा झळकणार असल्याचं कळतंय.

‘दबंग २’ मधील ‘फेव्हिकोल से’ हा आयटम साँग खूप गाजला. त्यामुळे असाच काहीसा आयटम साँग ‘दबंग ३’मध्येही पाहायला मिळणार आहे. या गाण्यासाठी करिना कपूरची वर्णी लागली आहेत. तर या आयटम साँगची कोरिओग्राफी प्रभू देवा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अरबाज खान ‘दबंग ३’ची निर्मिती करत आहे. ‘दबंग’मध्ये मलायका अरोरा ‘मुन्नी बदनाम हुई’ या आयटम साँगवर थिरकली होती. तर दुसऱ्या भागातील करिनाच्या ‘फेव्हिकॉल से’ या गाण्याने धुमाकूळ घातला. आता पुन्हा एकदा तिसऱ्या भागात करिनाच झळकणार आहे.

‘दबंग ३’मध्ये सलमान, सोनाक्षीसोबतच अश्वनी मांजरेकरची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तर चित्रपटातील उर्वरित कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यातच आहेत. येत्या मार्चमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.