अभिनेत्री करीना कपूर खानने नुकताच एक फोटो शेअर करत चाहत्यांना गोंधळात टाकलं होतं. करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोनोग्राफी हातात पकडलेला एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे करीना तिसऱ्यांदा आई होणार का? अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. करीनाने तिच्या या तिसऱ्या मुलाबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. करीनाचं हे तिसरं मूल म्हणजेच तिचं पुस्तक आहे असं जाहीर केलं होतं. करीना कपूरने तिच्या पुस्तकाचं नाव देखील जाहीर केलं होतं. मात्र आता करीना तिच्या या तिसऱ्या मुलाच्या म्हणजेच पुस्ताकाच्या नावामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. करीनाने तिच्या या पुस्तकात गरोदरपणातील अनुभव मांडले आहेत. या पुस्तकाला तिने ‘करीना कपूर खानस् प्रेग्नेंसी बायबल’ असं नाव दिलंय. या नावावरच ऑल इंडिया माइनॉरिटी बोर्डाने प्रश्न उपस्थित केले आहेत.

करीनाने नुकत्याच तिच्या ;करीना कपूर खानस् प्रेग्नेंसी बाइबल’ या पुस्तकाची घोषणा केली आहे. मात्र या पुस्काच्या नावाला ऑल इंडिया माइनॉरिटी बोर्डाने विरोध केला आहे. वृत्तानुसार ऑल इंडिया माइनॉरिटी बोर्डाचे अध्यक्ष डायमंड युसुऱ यांनी कानपुरमध्ये एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत करीना कपूरचं पुस्तक ‘करीना कपूर खानस् प्रेग्नेंसी बाइबल’ च्या नावाला विरोध करण्यात आलाय.

हे देखील वाचा: पती राज कौशलच्या आठवणीत मंदिरा बेदी भावूक, मध्यरात्री शेअर केली ‘ही’ पोस्ट

या बैठकीत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे ऑल इंडिया माइनॉरिटी बोर्ड कायदेशीर बाबींची तडताळणी करून करीना कपूर विरोधात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

करीना कपूरने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ती किचनमध्ये ओव्हनमधून एक पुस्तक काढताना दिसतेय. पोस्टमध्ये ती म्हणाली, “हा माझा प्रवास आहे. माझ्या दोन्ही प्रेग्नेंसी आणि माझं प्रेग्नेंसी पुस्तक बायबल. काही चांगले दिवस तर काही वाईट. काही दिवस मी कामावर जाण्यासाठी उत्सुक होते तर काही वेळा अंथरुणातून उठणंही कठिण होतं. यात मी गरोदरपणातील माझ्या शारिरीक आणि मानसिक स्थितीबद्दल लिहिलं आहे. ” असं म्हणत करीनाने तिचं पुस्तक म्हणजे तिचं तिसरं मूल असल्याचं या पोस्ट मध्ये म्हंटलं होतं.