बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो नेहमीच चर्चेत असतो. नेहमीप्रमाणेच यावेळी त्याने आपला एक आकर्षक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मात्र या फोटोवर रिप्लाय देण्यासाठी त्याने चाहत्यांकडे तब्बल एक लाख रुपयांची मागणी केली आहे.
View this post on Instagram
कार्तिकनं का केली पैशांची मागणी?
कार्तिकने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोवर एका चाहत्याने एक अनोखी कॉमेंट केली होती. “माझ्या कॉमेंटवर रिप्लाय दे. या रिप्लायसाठी मी तूला एक लाख रुपये देतो.” अशी कॉमेंट या चाहत्याने केली होती. यावर कार्तिक म्हणाला, “हा घे रिप्लाय कुठे आहेत एक लाख रुपये” त्याची ही गंमतीशीर कॉमेंट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. या एक लाख रुपयांच्या प्रकरणानंतर काही चाहत्यांनी तर पाच लाख, २० लाख अशी वाट्टेल ते आकडे सांगून कार्तिकचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.