News Flash

फोटो पेक्षा कतरिनाच्या शूजची चर्चा..किंमत ऐकलीत का?

कतरिनाच्या शूजची किंमत ऐकून व्हाल थक्क!

कतरिना ही रीबॉकची ऑफिशल ब्रँड अम्बॅसिडर आहे.

उत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील मनमोहक हास्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. कतरिना तिच्या फिटनेसमुळे आणि डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. कतरिना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर तिच्या फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता शेअर केलेल्या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी कारण हे थोडं वेगळं आहे.

कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने वर्कआऊट करतानाचे कपडे परिधान केल्याचे दिसतं आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे कतरिनाच्या शूजकडे गेले आहे. तिचे शूज हे वेगळे आहेत. कतरिनाने लाल रंगाचे शूज परिधान केले असून ते शूज रीबॉक आणि मैसन मार्गीला कोलॅबरेशनच्या कलेक्शन मधले आहेत.

आणखी वाचा : मासिक पाळी आणि १०२ ताप, रवीनाने सांगितला ‘टिप टिप बरसा पाणी’च्या चित्रीकरणाचा अनुभव

katrina kaif s new workout shoes कतरिनाच्या शूजची किंमत ऐकून व्हाल थक्क!

या शूजचा फोटो शेअर करत हे शूज लिमिटेड एडिशचे असल्याचे तिने सांगितले आहे. या शूजची किंमत ही ४० हजार रुपये आहे. रीबॉकच्य अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार “द स्प्लिट-टो हे मैसन मार्गीलाच्या ताबी शूज” आणि पायावर असलेला तो पट्टा हा ग्लॅडीएटर सॅन्डलचा अनुभव देतो.

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

कतरिना ही रीबॉकची ऑफिशल ब्रँड अम्बॅसिडर आहे. कतरिना बऱ्यावेळा रीबॉकचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. कतरिना लवकरच फोन भूत या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कतरिनासोबत सिद्धार्थ चतुर्वेदी आणि इशान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे गुरमीत सिंग करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 2:46 pm

Web Title: katrina kaif s new workout shoes have a whopping price tag can you guess the cost dcp 98
Next Stories
1 “आता अँटीबॉडीज लोड होत आहेत”; कार्तिक आर्यनने घेतली करोनाची पहिली लस
2 मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसच्या ‘सत्यनारायण की कथा’ चित्रपटात झळकणार कार्तिक आर्यन
3 …म्हणून शाहरुख खान अक्षय कुमारसोबत काम करत नाही; किंग खानने केला होता खुलासा
Just Now!
X