News Flash

रेल्वे रुळावर कतरिना करतेय तरी काय?

कतरिना सध्या 'जग्गा जासूस' या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.

कतरिना कैफ

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. काही काळापूर्वी सोशल मीडियावरुन चार हात लांब असणारी कतरिना सध्या मात्र या माध्यमांवर बरीच सक्रिय दिसत आहे. कतरिना सध्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. अनुराग बासू दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. कतरिना तिच्या फेसबुकवरुन या चित्रपटाबाबतची बरीच माहितीसुद्धा शेअर करत असते.

नुकतेच कतरिनाने ‘जग्गा जासूस’च्या चित्रीकरणादरम्यानचा एक फोटो तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती रेल्वे रुळावर बसलेली दिसत असून चेहऱ्यावर कोणतेही भाव नसलेल्या कतरिनापासून काही अंतरावर रेल्वेही दिसतेय. त्यामुळे कतरिना रेल्वे रुळावर करतेय तरी काय? असाच प्रश्न अनेकांना पडल्यावाचून राहात नाही. पण, हा फोटो चित्रपटाच्या चित्रीकरणाचाच एक भाग आहे, हे कतरिनाने त्या फोटोच्या कॅप्शनमधून स्पष्ट केले आहे.

वाचा: ‘ब्रेकअप’मधून सावरण्यासाठी कतरिनाने काढला ‘हा’ तोडगा

‘ब्रेकअप’नंतर कॅट आणि रणबीरचा हा पहिलाच चित्रपट आहे. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आता रणबीर आणि कतरिनाने एकमेकांपासून दूर राहणेच पसंत केले आहे. नुकतेच या चित्रपटाच्या सेटवर रणबीर कपूरचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पण, या सर्व सेलिब्रेशनमध्ये कतरिना मात्र कुठेही दिसली नाही. या दोन्ही कलाकारांच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण करताना अडचणी येत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी सूत्रांनी दिली होती. दरम्यान अनुराग बासू आणि रणबीर कपूरच्या निर्मितीमध्ये हा चित्रपट साकारत आहे. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात कॅट आणि रणबीरचा ‘जग्गा जासूस’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 4:57 pm

Web Title: katrina kaif seen to be sitting on railway track in still from her next movie jagga jasoos
Next Stories
1 यो यो रणवीर सिंग!
2 पाकिस्तानमध्ये भारतीय टेलिव्हिजन आणि रेडिओ सेवांवर बंदी
3 अनुष्का आणि विराटच्या नात्यात पुन्हा दुरावा?
Just Now!
X