‘कौन बनेगा करोडपती’ हा छोट्या प़द्यावरील गाजलेला शो देशभरातील अनेकांची मोठी स्वप्न साकार करत आहे. या शोमध्ये अनेक स्पर्धक सहभाग घेत आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर लाखो रुपये जिंकत आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंगळवारच्या भागात राजस्थानच्या जोधपूरमधील अक्षय ज्योत रत्नू यांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. अक्षय यांनी १२ लाख ५० हजारांसाठी विचारलेल्या प्रश्नावर गेम सोडला आणि ते ६ लाख ४० हजार रुपयांची रक्कम जिंकले.

अक्षय रत्नू यांनी मोठ्या संयमाने या गेममध्ये प्रश्नांची उत्तरं दिली. अक्षय यांनी ६ लाख ४० हजारांसाठी विचारलेल्या प्रश्नासाठी त्यांची शेवटची ५०-५० ही लाइफ लाइन वापरली आणि ते रक्कम जिंकले . मात्र त्या पुढील प्रश्नाचं उत्तर न आल्याने त्यांना गेम सोडला. १२ लाख ५० हजारांसाठी त्यांना पुढील प्रश्न विचारण्यात आला होता.

प्रश्न: असे मानले जाते की औषधाशी संबंधित ‘गौज’ हे नाव या ठिकाणावरून आले आहे?
A: गांजीटेप
B: गाजीपुर
C: गाजा
D: गाजियाबाद

हे दोेखील वाचा: “पांढरे केस का लपवत नाहीस?”; वडिलांच्या प्रश्नावर समीरा रेड्डीने दिलं ‘हे’ उत्तर

या प्रश्नाची अक्षय यांना काहीच कल्पना नसल्याने त्यांनी गेम सोडला. या प्रश्नाचं योग्य उत्तर C: गाजा हे आहे. अक्षय यांनी ६ लाख ४० हजार रुपये इतकी रक्कम जिंकली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर येत्या शुक्रवारी म्हणजेच ‘शानदार शुक्रवार’ या खास भागात यावेळी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा आणि पी श्रीजेश हजेरी लावणार आहेत.