News Flash

‘KGF 2’ फॅन्ससाठी आनंदाची बातमी; या तारखेला रिलीज होणार ‘अधीरा’ सॉंग!

'केजीएफ २' मधील अधीरा म्हणजेच अभिनेता संजय दत्तची एक झलक प्रेक्षकांना दाखवण्यासाठी निर्मात्यांनी एक सरप्राईज प्लॅन केलाय.

kgf-chapter-2-sanjay-dutt-aka-adheeras-introductory-song

साउथ सुपरस्टार यशचा आगामी ‘केजीएफ २’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो प्रसिद्धीच्या झोतात आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘केजीएफ २’ फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. ‘केजीएफ २’ मधील अधीरा म्हणजेच अभिनेता संजय दत्तची एक झलक प्रेक्षकांना दाखवण्यासाठी निर्मात्यांनी एक सरप्राईज प्लॅन केलाय. अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवशी म्हणजेच उद्या या सरप्राईज प्लॅनचा खुलासा करणार आहे.

‘केजीएफ’ चित्रपटाच्या यशानंतर निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी ‘केजीएफ २’ भेटीला आणला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील अभिनेता संजय दत्तच्या ‘अधीरा’चा फर्स्ट लूक लॉंच केला होता. त्यानंतर चित्रपटातील रहस्यमयी अधीराला पाहण्यासाठी फॅन्स खूप आतुरले आहेत. हे पाहून आता ‘केजीएफ २’ च्या निर्मात्यांनी फॅन्ससाठी आणि सोबत अभिनेता संजय दत्तसाठी सरप्राइज प्लॅन केला आहे. उद्या अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवशी ‘केजीएफ २’ मधील इंट्रोडक्ट्ररी सॉंग आउट करून संजय दत्तला अनोखं गिफ्ट देण्यात येणार आहे. या गाण्यात संजय दत्तने साकारलेल्या ‘अधीरा’चं ग्रॅण्ड वेलकम केलं आहे. या गाण्यासाठी हिंदी, कन्नड, तेलुगु आणि तमिळ सिनेमातील बड्या गायकांनी आवाज दिलाय. या गाण्यातील कोरिओग्राफी बजरंगी मोहन यांनी केलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

‘केजीएफ 2’ चित्रपटाला अधीराचा लुक लॉंच केल्यानंतर उद्या पहिलं सॉंग आउट करणार असले तरी अद्याप चित्रपटाची रिलीज डेट मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. हा चित्रपट याच वर्षीच्या जुलै महिन्यात रिलीज करण्यात येणार होता. पण करोनाच्या दुसऱ्या लाटेने त्यांच्या सर्व प्लॅनिंगवर पाणी फेरलं. त्यानंतर चित्रपटाच्या मेकर्सनी रिलीजची दुसरी तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. यश स्टारर ‘केजीएफ २’ मध्ये संजय दत्त मुख्य खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. तसंच अभिनेत्री रविना टंडन सुद्धा या चित्रपटात दिसून येणार आहे. तिने ‘केजीएफ’च्या पहिल्या पार्टमधूनच डेब्यू केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hombale Films (@hombalefilms)

साउथचा सुपरस्टार ‘यश’ हा अभिनेता या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून ‘केजीएफ १’ नंतर प्रेक्षकांच्या या चित्रपटाकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. अशात उद्या संजय दत्तच्या वाढदिवशी रिलीज होणारं गाणं पाहून या चित्रपटाची पहिली झलक पाहता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 6:23 pm

Web Title: kgf chapter 2 sanjay dutt aka adheeras introductory song to release on actors birthday prp 93
Next Stories
1 ‘आणि काय हवं ३’ चा ट्रेलर रिलीज; लग्नाच्या ५ वर्षांनंतर कसं असेल साकेत आणि जुईचं नातं?
2 ‘तानाजी’ फेम इलाक्षी गुप्ताच्या पहिल्या म्युझिक व्हिडीओचे पोस्टर प्रदर्शित
3 काश्मीरमध्ये शाळेसाठी अक्षय कुमारने दिली ‘१ कोटी’ रुपयांची देणगी
Just Now!
X