रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि मॉडेल किम कार्दशियन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. बऱ्याच वेळा ती तिच्या आयुष्यातील घटना किंवा प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिचं किचन आणि प्रचंड मोठा असा फ्रिज दाखविला आहे.
किमच्या घरात असलेला फ्रिज प्रचंड मोठा असून यात ती लहान मुलांसाठी पौष्टिक पदार्थ साठवून ठेवते. यात हिरव्या भाज्या, दही, ताजी फळं यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. विशेष म्हणजे किमच्या घरातील फ्रिज एखाद्या रुमइतका मोठा आहे. इतकंच नाही तर या फ्रिजमध्ये ती फिरताना दिसते. तिने या फ्रिजमध्ये फिरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
किमच्या घरातील हा भव्य फ्रिज पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली. ‘हा फ्रिज तर एखाद्या बाथरुमएवढं मोठं आहे’, असं एकाने म्हटलं आहे. तर ‘मास्टरशेफ किचनला हा फ्रिज कॉम्पिटीशन देत असल्याचं’, अन्य एका युजरने म्हटलं आहे. दरम्यान, किम सतत चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. अलिकडेच ती रॅपर केनी वेस्टला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती.