News Flash

“मी आता लिपस्किट पण नाही लावली”, म्हणत किरण खेर यांनी कॅमेरासमोर येण्यास दिला नकार

एप्रिल महिन्यात किरण खेर यांना कॅन्सर झाल्याची माहिती अनुपम खेर यांनी दिली होती.

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. किरण यांचा मुलगा सिंकदर खेरने हा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. काही दिवसांपूर्वीच सिकंदर खेर याने शेअर केलेल्या व्हिडीओत बऱ्याच दिवसांनंतर किरण खेर यांची पहिली झलक पाहायला मिळाली होती. यावेळी त्यांनी चाहत्यांचे आभारही मानले होते. मात्र सिकंदरच्या या नव्या व्हिडीओत किरण खेर यांनी कॅमेरासमोर येण्यास नकार दिलाय.

सिकंदरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओची सुरुवात अनुमप खेर यांच्यापासून झाल्याचं दिसतंय. व्हिडीओच्या सुरुवातीला अनुपम खेर यांच्य़ाशी सिकंदर संवाद साधताना दिसतोय़. त्यानंतर सोफ्यावर किरण खेर यांचे पाय दिसून येत आहेत. पायानींच त्या हाय करतात. यावर अनुपम खेर सिकंदरला त्याने किरण खेर यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करावा असा सल्ला देतात. मात्र किरण खेर यासाठी नकार देतात. “मी आता लिपस्किट पण नाही लावली, मल नाही करायचं.” असं किरण खेर या व्हिडीओत म्हणत आहेत.

हे देखील वाचा: “साडी नेसून जायला हवं होतं”, गुलजार यांच्या भेटीला गेलेल्या नीना गुप्ता शॉर्ट्समुळे झाल्या ट्रोल

हे देखील वाचा: देसी गर्ल प्रियांका चोप्राने देसी पदार्थांवर मारला ताव; अमेरिकेत खातेय ब्रेड पकोडे आणि डोसा

या व्हिडीओत किरण खेर यांचा फक्त आवाज ऐकू येतोय. आणि त्यांचे पाय दिसत आहेत. हा व्हीडीओ शेअर करत सिकंदर कॅप्शनमध्ये म्हणाला, “खेर साहेब आणि किरणजी, किरणजीने सगळ फुटेज घेतलं. त्यांचे पाय पाहूनच एन्जॉय करा.”

एप्रिल महिन्यात किरण खेर यांना कॅन्सर झाल्याची माहिती अनुपम खेर यांनी दिली होती. सध्या किरण खेर यांची प्रकृती सुधारतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 10:07 am

Web Title: kiran kher refused to come in front of camera when son sikandar recording video kpw 89
Next Stories
1 आर डी बर्मन यांच्या लग्नाच्या प्रपोजलला आशा भोसले यांनी आधी दिला होता नकार!
2 ‘शोले’ आणि ‘दीवार’ एकाच वेळी करताना…
3 ‘ओटीटीने मक्ते दारी संपवली’
Just Now!
X