02 December 2020

News Flash

बहीण कृष्णाचा बोल्ड अंदाज पाहून टायगर झाला अवाक्; म्हणाला…

कृष्णाचा ग्लॅमरस व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफची बहिण कृष्णा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या मादक फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी देखील तिने असाच एक मादक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून स्वत: टायगर देखील अवाक् झाला. त्याने यावर एक अनोखी कॉमेंट केली. त्याच्या या लक्षवेधी कॉमेंटमुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Shroff (@kishushroff)

या व्हिडीओत कृष्णा लाल रंगाची बिकीनी परिधान करुन एका पूलशेजारी बसलेली दिसत आहे. “लाल रंगात मी जाड दिसते का?” असा प्रश्न तिने या व्हिडीओव्दारे आपल्या चाहत्यांना विचारला. तिच्या या प्रश्नावर ‘खूप जाड’ अशी कॉमेंट टायगरने केली. शिवाय ‘हॉट आणि फायर इमोटिकॉन’ असं म्हणत दिशा पटानीने तिचं कौतुक देखील केलं. टायगरच्या गंमतीशीर कॉमेंटमुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कृष्णा तिच्या या हटके अंदाजामुळे पहिलांदाच चर्चेचा विषय ठरली नाही तर या आधी देखील तिने काही मादक फोटो शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Shroff (@kishushroff)

कृष्णाने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी तिचा चाहता वर्ग हा मोठा आहे. कृष्णा तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. कृष्णा नेहमीच तिचा बॉयफ्रेंड एबन हॅम्ससोबत फोटो शेअर करायची मात्र काही दिवसांपुर्वी कृष्णाने बॉयफ्रेंड एबन हॅम्ससोबत ब्रेकअप झाल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:55 pm

Web Title: krishna shroff hot photos tiger shroff comment dcp 98
Next Stories
1 सेलिना जेटलीच्या मुलाचा झाला होता मृत्यू, पोस्ट शेअर करत झाली भावूक
2 बिग बी, अजयच्या ‘मेडे’मध्ये रकुल प्रीतची वर्णी; साकारणार ‘ही’ भूमिका
3 बिग बी-नागराज यांच्या ‘झुंड’चे प्रदर्शन अडचणीत; सर्वोच्च न्यायालयानेच घातली बंदी
Just Now!
X