अभिनेता सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवला जात आहे. अनेक स्टार किड्सवर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. दरम्यान गायक सोनू निगमने देखील या मक्तेदारीवर बोट ठेवलं होतं. सुशांतप्रमाणे आणखी काही तरुण कलाकार आत्महत्या करतील अशी भीती त्याने व्यक्त केली होती. त्याच्या या वक्तव्याला गायक कुमार सानू यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. सर्वाधिक घराणेशाही बॉलिवूडमध्येच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अवश्य पाहा – “…अन्यथा घराणेशाही थांबवणं अशक्य”; स्टार किडनेच केली बॉलिवूडची पोलखोल
अवश्य पाहा – करोना ‘मास्क’ला हिंदीमध्ये काय म्हणाल?; बिग बींनी दिलेलं उत्तर पाहून चक्रावून जाल
कुमार सानू यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “सुशांत एक उत्तम अभिनेता होता. खूप कमी कालावधीत त्याने यश संपादीत केलं. अशा गुणी कलाकाराने आत्महत्या करणं दुदैव आहे. खरं तर घराणेशाही सर्वच क्षेत्रांमध्ये दिसते. परंतु त्याचा सर्वाधिक प्रभाव बॉलिवूडवर आहे हे नाकारता येणार आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत बॉलिवूडमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या नव्या कलाकारांनी सर्वप्रथम एखादी नोकरी पकडावी त्यानंतर आपल्या स्वप्नांच्या दिशेने मार्गक्रमण करावे.” असा सल्ला त्यांनी या व्हिडीओद्वारे नव्या कलाकारांना दिला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
यापूर्वी काय म्हणाला होता सोनू निगम?
सोनू निगम याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने नव्या कलाकारांसोबत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. “अभिनय क्षेत्रात घराणेशाही तर आहेच, परंतु ही परंपरा आता संगीतच्या दुनियेतही सुरु झाली आहे. दिग्दर्शक, निर्माता तयार असतानाही अनेक नव्या कलाकारांना संगीत कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे काम मिळत नाही. हा प्रकार त्वरित थांबवा अन्यथा आता संगीत क्षेत्रातही आत्महत्या सुरु होतील अशी भीती मला वाटतेय.” असे विचार सोनू निगम याने व्यक्त केले.