23 October 2020

News Flash

महेश मांजरेकरांच्या मुलीवर मराठी कलाकारही फिदा, वाचा हे कमेंट्स

सलमानच्या 'दबंग ३' या चित्रपटातून सई बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे

सई मांजरेकर

गेल्या वर्षभरात बऱ्याच स्टारकिड्सचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं. यामध्ये आता आणखी एका नावाची भर पडणार आहे. विशेष म्हणजे ही एका मराठी कलाकाराची मुलगी आहे. अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात सलमान तिला लाँच करतोय. सलमानच्या ‘दबंग ३’ या चित्रपटातून सई बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे आणि पदार्पणापूर्वीच ती सोशल मीडियावर हिट ठरली आहे.

सई इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रीय असून गेल्या काही दिवसांत तिच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांसोबतच कलाकारांचेही कमेंट्स पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी सईने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमधील तिचं सौंदर्य व आत्मविश्वास पाहून मराठी कलाकारसुद्धा स्तुती करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. ”ओह माय गॉड, ही तर फक्त सुरुवात आहे. तू खरंच एक परी आहेस,” अशा शब्दांत अभिनेत्री अमृता खानविलकरने सईची प्रशंसा केली. तर तू आधीपासूनच स्टार आहेस, असं क्रांती रेडकरने लिहिलं. अभिनेत्री पूजा सावंतनेही सईच्या फोटोवर इमोजी पोस्ट केले आहेत.

सई ही महेश मांजरेकर यांची धाकटी मुलगी आहे. आगामी ‘दबंग ३’ चित्रपटात ती सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात सलमानने सईसोबत एण्ट्री केली होती. त्यामुळे सर्वांच्या नजरा सईवरच खिळल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 12:35 pm

Web Title: mahesh manjrekar daughter saie manjrekar photos got marathi artists attention ssv 92
Next Stories
1 अली जफरने केला छळ; पाकिस्तानी गायिकेने मानहानीपोटी मागितले दोन अब्ज रूपये
2 Video : ‘इंडियन २’मुळे कमल हासन पोहोचले कारागृहात
3 अंगणवाडी सेविका ते करोडपती, बबिता यांचा थक्क करणारा प्रवास
Just Now!
X