कोणतीही पूर्वसूचना न देता ऐनवेळी शूटिंगसाठी बोलावणाऱ्या मराठी दिग्दर्शकावर निर्माते व दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला. तेजपाल वाघ या नवीन दिग्दर्शकाने त्याची कारभारी जरा दमानं ही नवीन मालिका झी मराठीवर सुरू होत असल्याचं महेश टिळेकर यांना फोन करून सांगितले आणि त्यासाठी आशीर्वाद म्हणून महेश टिळेकर यांनी त्या मालिकेत भूमिका करावी अशी विनंती केली.नवीन दिग्दर्शकाला आपल्याकडून फायदा होत असेल तर सहकार्य केले पाहिजे या भावनेतून महेश टिळेकरांनी होकार दिला. 10 ऑक्टोंबर पासून शुटींग सुरू होत आहे त्यानंतर शूटिंगला बोलवतो असे दिग्दर्शक तेजपाल वाघ यांनी सांगितले. मात्र त्यानंतर संबंधित दिग्दर्शकाकडून काहीच उत्तर आले नाही.

कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?

‘दुसऱ्याला गृहीत धरून एकदा बोलणे झाल्यावर दिग्दर्शकाने नंतर कुठलाही संपर्क न ठेवता अचानक दिग्दर्शकाच्या वतीने त्याचा प्रोडक्शन मॅनेजर शुटिंगच्या एक दिवस आधी रात्री फोन करून दुसऱ्या दिवशी अकलूज येथे शूटिंगला या म्हणतो, हा कुठली कामाची पद्धत की माज?’, असा सवाल टिळेकरांनी फेसबुक पोस्टद्वारे केला. फोन करणाऱ्या त्या व्यक्तीचा कडक शब्दात समाचार घेत ‘मी पण अनेक प्रसिद्ध आणि नवोदित सर्व कलाकारांच्या बरोबर काम केलं आहे. पण काम करताना समोरच्या व्यक्तीचा रिस्पेक्ट ठेवून त्याच्याशी बोलण्याचे सौजन्य ही आताच्या पिढीतील काही दिग्दर्शक, निर्माते का दाखवत नाही’,असे टिळेकर यांचे म्हणणे आहे. आणि मला मालिकेत काम द्या म्हणून मी मागणी केली नव्हती.त्या नवीन दिग्दर्शकाने स्वतः हून मला फोन केला होता त्यामुळे समोरच्या व्यक्तीबरोबर, कलाकारांच्या बरोबर संपर्क साधताना सौजन्य दाखवले पाहिजे असा सल्लाही महेश टिळेकर यांनी दिला आहे