गुरुवारी संपूर्ण देशभरात ‘करवा चौथ’ हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील नटुन-थटून करवा चौथ साजरा करत सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये अनुष्का शर्मा, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, बिपाशा बासू अशा अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. पण सध्या चर्चा सुरु आहे ती मंदिरा बेदीने शेअर केलेल्या फोटोची. मंदिराने पती राज कौशलसोबत करवा चौथ साजरा करतानाचा फोटो शेअर केला. पण हा फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी मंदिरावर निशाणा साधला आहे.

मंदिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर करवा चौथचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मंदिरा पती राज कौशलसोबत असून तिने सुंदर साडी नेसली असल्याचे दिसत आहे. दरम्यान मंदिराच्या पतीच्या हातात वाईनचा ग्लास असल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांनी तो वाईनचा ग्लास पाहून मंदिराला ट्रोल केले आहे.

नेटकऱ्यांनी मंदिराला चांगलेच सुनावले आहे. एका नेटकऱ्याने तर भारतीय संस्कृतीमधील सणांची खिल्ली तरी उडवू नये असे म्हटले आहे.

आणखी वाचा :…म्हणून लग्नानंतरही १२ वर्षे मंदिरा बेदी होऊ शकली नाही आई

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडनने अभिनेते अनिल कपूर यांच्या घरी करवा चौथ साजरा केला आहे. दरम्यान शिल्पा शेट्टीने लाल रंगाची साडी नेसली होती. या लूकमध्ये शिल्पा अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. तर दुसरीकडे विराट कोहली आणि अनुष्का शर्माने करवा चौथ साजरा करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.