News Flash

मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या यूजर्सवर भडकली सोना मोहपात्रा; म्हणाली, “मूर्खतेची सीमा पार केली..”

मंदिरा बेदीची बाजू घेत अभिनेत्री सोना मोहपात्रा ट्रोलर्सवर भलतीच भडकलीय. तसंच मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना सोना मोहपात्राने जबरदस्त उत्तर सुद्धा दिलंय.

(Photo: Sona Mohapatra/Instagram)

मंदिरा बेदीचे पती राज कौशलच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम यात्रेमध्ये अभिनेत्री मंदिरा पार्थिव उचलताना आणि अंतिम संस्कारमधील इतर विधी देखील पार पाडताना दिसून आली होती. अनेक वर्षाच्या परंपरा मोडत मंदिरा बेदी हिने पतीच्या अंतिम संस्काराच्या विधी पार पाडल्या. यावरून सोशल मीडियावर अनेक युजर्स तिचं कौतुक करत आहेत, तर काही युजर्स तिला ट्रोल करतायत. यात मंदिरा बेदीची बाजू घेत अभिनेत्री सोना मोहपात्रा ट्रोलर्सवर भलतीच भडकलीय. तसंच मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना सोना मोहपात्राने जबरदस्त उत्तर सुद्धा दिलंय.

मंदिरा बेदीने पती राज कौशल यांच्या अंतिम संस्कार प्रसंगी परिधान केलेल्या व्हाईट टी-शर्ट आणि जीन्सवरून सुद्धा तिला ट्रोल करण्यात आलंय. ट्विटरवर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देऊन त्यांची तोंड बंद करण्यासाठी अभिनेत्री सोना मोहपात्राला ओळखलं जातं. अभिनेत्री मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या अशाच ट्रोलर्सना सोना मोहपात्राने ट्विट करत चांगलंच उत्तर देऊन खडसावलंय. या ट्विटमध्ये तिने लिहिलंय, “काही लोक अजुनही मंदिरा बेदीने पती राज कौशल यांच्या अंतिम संस्कार प्रसंगी परिधान केलेल्या कपड्यांवरून ट्रोल करत आहेत…याचं जास्त आश्चर्य वाटत नाही…शेवटी आपल्या देशात इतर गोष्टींपेक्षा मुर्खता मोठ्या प्रमाणात आहे.”

मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचं बुधवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला. राज कौशल हे ४९ वर्षांचे होते. त्यांच्यावर बुधवारी शिवाजी ग्राऊंड स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अभिनेता रोनित रॉय, त्याची पत्नी निलम सिंह, मानसी जोशी रॉय, समीर सोनी आणि आशीष चौधरी सारखे कलाकार सामील झाले होते. त्यांच्यावर अंतिम संस्कारानंतर अभिनेत्री रवीना टंडन, मौनी रॉय, रोहित रॉय, अदिति गोवित्रिकर, विद्या मालवडे आणि सुलेमान मर्चेंट हे मंदिरा बेदीचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 12:37 pm

Web Title: mandira bedi trolled for performing husband raj kaushal last rites angry sona mohapatra prp 93
Next Stories
1 आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट ; १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर झाले विभक्त
2 केआरके तापसी पन्नूला म्हणाला ‘सी ग्रेड’ अभिनेत्री; ‘हसीन दिलरुबा’ सिनेमाबद्दल म्हणाला…
3 अभिनेता डिनो मोरियाची संपत्ती जप्त, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई
Just Now!
X