News Flash

“…या कारणांमुळे एका आठवड्यातच मी केली कोरोनावर मात !”

मनिष मल्होत्राने सेल्फी शेअर करत केला आनंद व्यक्त

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने कोरोनावर मात केलीय. ५४ वर्षीय मनिष मल्होत्रा कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच कोरोना निगेटीव्ह झाले आहेत. ही आनंदाची बातमी त्यांने सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर केलीय.

मनिष मल्होत्राने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सेल्फी शेअर केलाय. यात गुलाबी रंगाची बॉर्डर असलेला काळ्या रंगाचा मास्क लावून त्यांनी सेल्फी काढल्याचं दिसतंय. ही फोटो शेअर करत त्याने ही बातमी सांगितली. ”दोन्ही वेळच्या टेस्टमध्ये मी निगेटीव्ह आलोय, तुमच्या सगळ्यांचे खूप आभार… मी बरा होण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनेसाठी…”, असं त्याने या पोस्टमध्ये लिहीलंय. ही बातमी शेअर करत असताना अवघ्या एकाच आठवड्यात कोरोनातून बाहेर कसा आला हे ही त्याने सांगितलं. ”लसीकरणामुळेच मी कोरोनाला हरवू शकलो, लसीकरण खूर गरजेचं आहे, सुरक्षित रहा”, असंही त्याने या पोस्टमधून सांगितलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manish Malhotra (@manishmalhotra05)

जाह्नवी कपूर, रिद्ध‍िमा कपूर साहनी, करण टैकर, सैय्यामी खेर, गौहर खान यांच्यासह इतर सेलिब्रीटीजनी ही मनीष मल्होत्रा कोरोनातून बाहेर आल्याचं समजताच आनंद व्यक्त केला.

मनिष मल्होत्रा यांनी अगदी कमी काळातच कोरोनावर मात केली आणि इतरांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. सध्या कोरोना लसीकरणाबाबत लोकांमध्ये अनेक शंका निर्माण होताना दिसून येत आहेत. त्या शंका दूर होऊन जास्तित जास्त लोकांना लसीकरणाबाबत जागृत करण्यासाठी मनिष यांनी आवर्जून लसीकरणाचा उल्लेख केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 1:24 pm

Web Title: manish malhotra tests corona negative shares post shows gratitude to well wishers prp 93
Next Stories
1 ‘कलंक आहेस तू’, त्या ट्वीटमुळे अनुपम खेर झाले ट्रोल
2 ‘राधे’मधील नवे गाणे प्रदर्शित, सलमानचा अनोखा अंदाज चर्चेत
3 ‘त्या’ पोस्टमुळे अभिषेक बच्चन ट्रोल, नेटकऱ्याला म्हणाला…
Just Now!
X