News Flash

मनोगत

मराठी भाषा परीक्षा व निबंध स्पर्धाचे आयोजन

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे उत्तरांचल प्रांतीय अधिवेशन
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीचे प्रथम प्रांतीय अधिवेशन २०१५ उत्तरांचल येथील देहरादून येथे नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी मंडळाच्या उत्तरांचलातील संलग्न संस्था व सदस्यांनी मोठय़ा उत्साहाने भाग घेतला. अधिवेशनाचे आयोजन महाराष्ट्र समाज कल्याण समिती, देहरादून यांनी केले होते. अधिवेशनाचे उद्घाटन महावीर अग्रवाल, कुलगुरू, उत्तराखंड संस्कृत महाविद्यालय, हरिद्वार यांनी मराठीत बोलून केले. मराठी बाणाचे कौतूक करताना मराठी माणसाचे मन राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर असते व त्याच्या आचरणात नैतिकता व स्वच्छ चारित्र्य हे गुणही असतात. माझी जन्मभूमी महाराष्ट्रात असल्याने मी ही परंपरा जवळून बघितली आहे असे ते म्हणाले. या प्रसंगी जन्माने अंध असलेले वयोवृद्ध संगीत शिक्षक दत्तोपंत जिंदेफ, देहरादून यांना सन्मानित करण्यात आले. तसेच युवा उद्योजक प्रशांत महाडिक, हरिद्वार यांचाही सत्कार केला गेला. याप्रसंगी कार्याध्यक्ष विलास बुचके यांनी उपस्थितांचे स्वागत केले व महासचिव रवी गिऱ्हे यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या योजनांची विस्तृत माहिती दिली. रंगारंग कार्यक्रमात देहरादूनचे कलाकार डीआरडीओत कार्यरत वैज्ञानिक राजन मराठे, मृदुला मराठे, विजया गोडबोले व सहकारी यांनी मराठी गीत-संगीत प्रस्तुत करून कार्यक्रमाला वेगळाच रंग दिला. अधिवेशनात देहरादून, हरिद्वार, चंदिगढ तसेच देशभरातील प्रतिनिधी व गुजरात येथील सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. उत्तरांचलचे विभागीय कार्यवाह वसंत बुधकर, हरिद्वार व डॉ. मुकुंद जोशी, देहरादून यांनी अधिवेशन सफल होण्यासाठी आपले योगदान दिले.

मराठी भाषा परीक्षा व निबंध स्पर्धाचे आयोजन
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीतर्फे संपूर्ण बृहन्महाराष्ट्रात मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विभिन्न परीक्षांचे आयोजन केले जाते. या वर्षीसुद्धा मराठी भाषा परीक्षा समितीतर्फे २ ऑक्टोबर २०१५ रोजी या परीक्षा व निबंध स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. याबद्दल माहिती देताना परीक्षा समिती प्रमुख सुभाष वाघमारे, इंदूर (०९४२४०८२१००) यांनी सांगितले की मराठी परीक्षा खालीलप्रमाणे आयोजित केल्या जातील.
’ परिचय-वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे
’ प्राज्ञ-इयत्ता पाचवी-मराठी सुलभ भारती
’ मध्यमा-इयत्ता सहावी- मराठी सुलभ भारती
’ कोविद प्रथम-इयत्ता सातवी-मराठी सुलभ भारती
’ कोविद द्वीतीय-इयत्ता आठवी-मराठी सुलभ भारती
कै. महादेव दत्तात्रय खाडिलकर (जन्मशताब्दी) स्मृती निबंध स्पर्धा २०१५
’ गट-१ (वय १२ ते १६), शब्द मर्यादा १५० ते ३००
विषय- आई थोर तुझे उपकार, ऋतुराज वसंत, माझा आवडता देशभक्त, शाळा आणि शिस्त, रम्य ते बालपण.
’ गट-२ (वय १७ ते ३०), शब्दमर्यादा ५०० ते ७५०
विषय- माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग, मातृभाषेचे ऋण, उद्योगाचे घरी लक्ष्मी वास करी, लग्न सोहळ्यातील गमती-जमती, आळस माणसाचा शत्रू.
’ गट-३ (वय ३०च्या वरील), शब्दमर्यादा ७५० ते १०००
विषय- भारताची न्याय व्यवस्था सामान्य जनांसाठी किती उपयोगी? भारताचे आर्थिक धोरण, बँकिंग क्षेत्र आणि सामान्यजनांचे आर्थिक सबलीकरण, सामान्य जनांचे प्रश्न सोडविण्यात प्रसार माध्यमांची भूमिका, स्त्री भ्रूणहत्या-एक शाप, आम्ही नवभारताचे शिल्पकार. परीक्षा समिती प्रमुखांनी बृहन्महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना व सदस्यांना निवेदन केले आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने वरील परीक्षांमध्ये सहभागी व्हावे, तसेच आपल्या क्षेत्रात नवीन केंद्र सुरू करावेत. विजेत्यांना योग्य पुरस्कार संस्थेतर्फे एका कार्यक्रमात दिले जातील.

अखिल भारतीय संगीत स्पर्धा २०१५ -‘गौरव बृहन्महाराष्ट्राचा’
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीतर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा बृहन्महाराष्ट्रातील नवोदित गायकांना पुढे आणण्यासाठी ‘गौरव बृहन्महाराष्ट्राचा’ ही अखिल भारतीय संगीत स्पर्धा-२०१५ आयोजित केली जात आहे. यावर्षी स्पर्धेची अंतिम फेरी महाराष्ट्र मंडळ, सागर, मध्यप्रदेश येथे २५ ऑक्टोबर २०१५, रविवार रोजी सकाळी १०.३० वाजता व विजेत्यांना पुरस्कार वितरण कार्यक्रम सायंकाळी ४.३० वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मध्यप्रदेश शासनाचे मा. डॉ. सीतासरनजी शर्मा, विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम स्थळ रवींद्र भवन, सागर हे आहे. अखिल भारतीय संगीत स्पर्धेसाठी संपूर्ण बृहन्महाराष्ट्रातील विभिन्न शहरात प्राथमिक फेरी आयोजित केली जाईल. या फेरीतील तीन विजेत्यांना आयोजकांद्वारे पुरस्कृत केले जाईल व प्रथम येणाऱ्या विजेत्याला अंतिम फेरीत भाग घेता येईल. अंतिम फेरीत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विजेत्यास अनुक्रमे रु. १००००/-, रु. ७५००/- व रु. ५०००/- नगदी पुरस्कार प्रदान केला जाईल. तसेच या प्रसंगी प्रथम येणाऱ्या विजेत्यास स्व. स्नेहलता पंडित व स्व. जयंतराव पंडित (गुलगुले कोटा-राजस्थान) यांचे स्मरणार्थ चांदीची शिल्ड गिरीश पंडित कोटा यांच्यातर्फे प्रदान केली जाईल. या संगीत आयोजनाच्या संयोजकपदी दीपक कर्पे, सहकोषाध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली यांची नियुक्ती केली गेली आहे. या प्रसंगी सर्व संगीतप्रेमींना निवेदन आहे की त्यांनी आपली उपस्थिती द्यावी. यासाठी दीपक कर्पे ०९४२५०४९५५४, रवी गिऱ्हे, महासचिव ०९८५०३९६०८० यांच्याशी संपर्क केला जाऊ शकतो.
– रेखा गणेश दिघे
rekhagdighe@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 1:10 am

Web Title: manogat
Next Stories
1 बाल गणेश पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
2 सामान्य तरुणाच्या आयुष्यावर चित्रित ‘दगडी चाळ’
3 अभिनय कट्टा ते “सिंड्रेला”!
Just Now!
X