01 October 2020

News Flash

‘जज्बा’मध्ये ऐश्वर्या-मनोज वाजपेयी एकत्र!

वेगळ्या विषयांच्या चित्रपटांमध्ये काम करण्यात मनोज वाजपेयीचा हातखंडा आहे.

| December 1, 2014 03:40 am

वेगळ्या विषयांच्या चित्रपटांमध्ये काम करण्यात मनोज वाजपेयीचा हातखंडा आहे. पण व्यावसायिक चित्रपटांमध्येही तो तेवढाच सक्रिय आहे. लवकरच त्याचा ‘तेवर’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांचीही भूमिका आहे. इतकेच नाही तर आता मनोज माजी विश्वसुंदरी आणि यम्मी मम्मी ऐश्वर्या राय बच्नसोबतही काम करणार आहे. संजय गुप्ताच्या ‘जज्बा’ या चित्रपटात हे दोघेही काम करणार आहेत. मनोज वाजपेयी हा यात मुख्य भूमिकेत नसला तरी त्याची भूमिका ही महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे चित्रपटातील इतर कलाकारांसोबतही अनेक दृश्य असणार आहेत. संजय गुप्तांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे; पण अद्याप काही औपचारिक कामे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जज्बा’मध्ये ऐश्वर्या वकिलाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.
या चित्रपटात ऐश्वर्या वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून, इरफान हा निलंबित पोलिसाची भूमिका साकारणार आहे. शबाना आझमी यात इरफानच्या भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम यात विशेष भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 3:40 am

Web Title: manoj bajpayee in jazbaa alongside aishwarya rai bachchan
Next Stories
1 अक्षयच्या ‘बेबी’ची चाहत्यांना उत्सुकता!
2 ‘बदलापूर’मध्ये वरुणचा अँग्री मॅन लूक
3 जीवनात थोडा गडबड-गोंधळ हवाच – अमिताभ बच्चन
Just Now!
X