24 January 2021

News Flash

प्रथमेश आणि ‘डार्लिंग’? नेमकं काय आहे प्रकरण

रितिका श्रोत्रीचं आहे का डार्लिंग?

करोनामुळे ओढावलेल्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. या काळात प्रत्येक क्षेत्रातील कामकाज ठप्प होतं. याला सिनेसृष्टीदेखील अपवाद नाही. कलाविश्वातील कामकाजदेखील बराच काळ बंद होतं. मात्र, हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून सिनेसृष्टी पुन्हा बहरु लागली आहे. त्यातच आता कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. अभिनेता प्रथमेश परब लवकरच त्याचा आगामी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘टाइमपास’, ‘टकाटक’ या गाजलेल्या चित्रपटानंतर प्रथमेश लवकरच डॉक्टर डॉक्टर आणि डार्लिंग या चित्रपटात झळकणार आहे. यापैकी डॉक्टर डॉक्टर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे डार्लिंग या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

समीर पाटील दिग्दर्शित ‘डार्लिंग’ या चित्रपट प्रथमेश मुख्य भूमिका साकारत असून अभिनेत्री रितिका श्रोत्री त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. यापूर्वी रितिका आणि प्रथमेशने ‘टकाटक’ या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा डार्लिंगच्या निमित्ताने ही जोडी एकत्र येणार आहे.

‘चौर्य’, ‘यंटम’ आणि ‘वाघे-या’ या सिनेमांचं यशस्वी दिग्दर्शन करणारे समीर आशा पाटील ‘डार्लिंग’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरणार आहेत. हा चित्रपट ७ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 12:33 pm

Web Title: marathi actor prathamesh parab new movie darling coming soon ssj 93
Next Stories
1 ‘पाणी देखील मागून प्यायलं’; ‘भाभी जी घर पर हैं’च्या अभिनेत्याचा संघर्षप्रवास
2 “एक वोट की कीमत तुम क्या जानो बिहारी बाबू”; अभिनेत्रीचा मतदारांना लाखमोलाचा सल्ला
3 फोटोतील ‘या’ चिमुकल्याला ओळखलं का? ‘मिर्झापूर’मध्ये साकारलीये जबरदस्त भूमिका
Just Now!
X