हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांना मिळणारे मानधन, जीवनशैली याची नेहमीच तुलना व चर्चा  होत असते. ‘बॉलिवूड’मधील कलाकार म्हणजे भरपूर ‘ग्लॅमर’, मानधन आणि त्यांच्याकडे असणाऱ्या आलिशान आणि महागडय़ा गाडय़ा असे समीकरण तयार झाले होते. गेल्या काही वर्षांत बॉलिवूडच्या तोडीस तोड ग्लॅमर, पैसा, प्रतिष्ठा मराठी कलाकारांनाही मिळू लागली आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, चित्रपट आणि नाटक या वेगवेगळ्या माध्यमातून मराठी कलाकारांनी मराठीसह हिंदीतही आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. मराठी कलाकार म्हणजे ‘गरीब बिच्चारा’, ‘टॅक्सी किंवा भाडय़ाची गाडी करुन येणारा’, कमी मानधन मिळणारा, ग्लॅमर नसलेला ही प्रतिमा गेल्या काही वर्षांपासून बदलायला सुरुवात झाली आहे. मराठी कलाकारांकडेही बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच किंवा एक पाऊल पुढे जात आलिशान आणि महागडय़ा गाडय़ा आल्या आहेत. ‘मराठी कलाकारांच्या दारी, आलिशान गाडय़ा भारी’ असे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांकडे स्कोडा, फोच्र्युनर, बीएमडब्ल्यु, मर्सिडिज् अशा गाडय़ा आहेत. मराठीतील कलाकरांच्या ‘कार’नाम्याचा हा आढावा..

हॉलीवूड किंवा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर पाहिलेल्या आलिशान आणि महागडय़ा गाडय़ा आपल्याकडील बॉलीवूड कलाकारांकडे दिसणे ही काही नवलाईची बाब राहिलेली नाही. राजकारणी, उद्योगपती आणि धनाढय़ व्यक्तींप्रमाणेच बॉलीवूडच्या कलाकारांकडे या गाडय़ा सर्रास पाहायला मिळतात. बदललेली जीवनशैली, कॉर्पोरेट व आयटी क्षेत्रातील नोकरी, बँकांकडून मिळणारे कर्ज यांमुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठीही स्वत:च्या मालकीची गाडी घेणे आता आवाक्याबाहेरची  गोष्ट राहिलेली नाही. अनेकांकडे आता त्यांना सहज परवडतील अशा गाडय़ा आल्या आहेत. विविध क्षेत्रातील ‘सेलिब्रेटी’ हे सर्वसामान्यांपेक्षा अशा बाबतीत नेहमीच एक पाऊल पुढे असतात. हॉलीवूड किंवा बॉलीवूडच्या चित्रपटांतून पाहिलेल्या अशा गाडय़ा घेणे ही फक्त बॉलीवूड कलाकरांची मक्तेदारी राहिलेली नाही. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधील कलाकार व दिग्दर्शकांकडेही आता या महागडय़ा आणि आलिशान गाडय़ा दिसू लागल्या आहेत.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

‘होणार सून मी या घरची’ मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी नुकतीच ‘रेंज रोव्हर’ ही आलिशान आणि महागडी गाडी घेतली आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील मराठी मालिकांच्या विश्वात अशा प्रकारची गाडी घेण्याचा पहिला मान मंदार यांच्याकडे जातो. रेंज रोव्हरचे डिस्कव्हरी स्पोर्टस् हे मॉडेल देवस्थळी यांनी घेतले असल्याचे समजते. याविषयी स्वत: देवस्थळी बोलायला उत्सुक नाहीत. त्यामुळे अधिक माहिती कळू शकलेली नाही. नाटक आणि चित्रपट यांमध्ये अत्यंत व्यग्र असलेला अभिनेता प्रशांत दामले यांच्याकडे सध्या ‘फोच्र्युनर’ही गाडी आहे. तर दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या शरद पोंक्षे यांच्याकडे ‘टाटा झेस्ट’ ही गाडी आहे. अभिनेत्री आदिती सारंगधर यांच्याकडे ‘स्कोडा’ तर अभिनेत्री आसावरी जोशी यांच्याकडे ‘अ‍ॅक्सेंट’ही गाडी आहे. तर दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका नाटक आणि चित्रपटांतून दिसणारा अभिनेता सुनील बर्वे याच्याकडे ‘मर्सिडीज’ गाडी आहे. अभिनेता प्रसाद ओक यानेही अलीकडेच ‘व्हॅनिटी’घेतली आहे. भरत जाधव याच्यानंतर स्वत:ची ‘व्हॅनिटी’असलेला प्रसाद ओक हा दुसरा मराठी कलाकार आहे.

आमची गाडी

  • कुशल बद्रीके- स्कोडा
  • अंकुश चौधरी-फोच्र्युनर
  • रवी जाधव-बीएमडब्ल्यु
  • स्वप्नील जोशी-बीएमडब्ल्यु
  • सचिन खेडेकर-मर्सिडिज्
  • उदय टिकेकर-मर्सिडिज्
  • महेश मांजरेकर-बीएमडब्ल्यु
  • सोनाली कुलकर्णी (ज्युनिअर)-स्कोडा
  • मिलिंद शिंदे-मारुती सुझुकी आर्टिगा
  • भूषण प्रधान-हुंदाई फ्ल्युईडिक व्हेर्ना

भरत जाधवची बस

मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून व्यग्र असणारा कलाकार म्हणून भरत जाधव याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मराठी कलाकारांमध्ये पहिली ‘व्हॅनिटी’ गाडी घेण्याचा मानही त्याच्या नावावर जमा आहे. भरतकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू या गाडय़ा आहेतच. यात आता नव्या कोऱ्या बसगाडीची भर पडली आहे. भरत जाधवची ‘भरत जाधव एन्टरटेंटमेंट’कंपनी असून आपल्या या नाटय़कंपनीसाठी भरतने ही नवी बस घेतली आहे. भरत जाधव याच्या नाटकांचे दौरे राज्यभरात विविध ठिकाणी सुरू असतात. नाटकाचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या सोयीसाठी या बसचा उपयोग केला जाणार आहे. खास करून लांबच्या प्रवासाकरिता ही बस तयार करवून घेण्यात आली असून त्यासाठी सुमारे २४ लाख रुपयांचा खर्च आला असल्याचे समजते.

२२० सी श्रेणीतील मर्सिडिज् अ‍ॅव्हन्टगार्डे ही गाडी मी २०१४ मध्ये घेतली. अशी गाडी आपल्याकडे असावी हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. गाडी चालविण्याचा आनंद वेगळाच आहे. या गाडीमुळे ‘लाँग ड्राइव्ह’सुकर झाले आहे. गाडीतील नवनवे फिचर्स खूप मस्त आहेत. इकॉनॉमी मोडमध्ये सिग्नलला गाडी बंद होते आणि ब्रेक सोडला की आपोआप सुरू होते. सन रुफ व मून रुफ आहे. वेग (स्पीड)खूप असल्याने जरा सांभाळावी लागते.

सुनील बर्वे

२०१३ मध्ये माझ्या नाटकांच्या एकूण झालेल्या १० हजार ७०० व्या प्रयोगाच्या निमित्ताने मी ‘फोच्र्युनर’ही गाडी घेतली. माझी आवडती गाडी ‘टाटा सफारी’ आहे. पण घरच्यांच्या आग्रहामुळे मी ही गाडी घेतली. अगदी पहिल्यांदा मी ‘फियाट’गाडी घेतली. त्यानंतर सुमो मग सफारी आणि आता ‘फोच्र्युनर’ ही गाडी आहे.

प्रशांत दामले  

माझ्याकडे ‘स्कोडा ऑक्टीव्हिया’ ही गाडी आहे. ही गाडी मी नुकतीच घेतली असून येत्या मे महिन्यात गाडीला एक वर्ष पूर्ण होईल.

वैभव मांगले

माझी ‘स्कोडा लॉरा’ ही गाडी मी चार वर्षांपूर्वी घेतली. ही गाडी पूर्णपणे ऑटोमॅटिक तसेच सहज चालवता येणारी (स्मुथ ड्राइव्ह) आणि ‘स्टेटस्’ सिम्बॉल असल्याने मला ती आवडते. हे माझे स्वत:चे वाहन  आहे.

आदिती सारंगधरै