मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै ही जोडी अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. मोठ्या थाटामाटात या दोघांचा लग्नसोहळा पार पडला असून कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. सध्या सोशल मीडियावर अभिज्ञा आणि मेहुलच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री मयुरी देशमुखने अभिज्ञाच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिज्ञा अत्यंत सुंदर दिसत असून तिच्या खास डिझायनर साडीची चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. अभिज्ञाने पर्पल- गुलाबी रंगाची डिझायनर नऊवारी साडी नेसली होती. तर मेहुलनेदेखील तिला मॅचिंग कपडे परिधान केले होते.
View this post on Instagram
मेहुल मुंबईत स्थायिक असून ऑक्टोबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर या दोघांच्याही घरी लग्नाची गडबड सुरु झाली होती. लग्नापूर्वीचे सगळे विधी अभिज्ञाच्या घरी थाटामाटात साजरे करण्यात आले असून यातील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
वाचा : “मी इन्स्टा’ग्रामीण’ माणूस”; निलेश साबळेचं सोशल मीडियावर पदार्पण
दरम्यान, या लग्नसोहळ्याला अभिनेता संजय मोने, अभिनेत्री मयुरी देशमुख, शर्वरी लोहकरे, ओमप्रकाश शिंदे या सारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिज्ञाप्रमाणेच लवकरच मिताली मयेकर- सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक असे काही मराठी कलाकार लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 9:13 am