News Flash

‘हो. मी डिप्रेशनमध्ये होते, पण…’; दिप्ती देवीचा खुलासा

दिप्तीने सांगितला डिप्रेशनचा अनुभव

‘मला सासू हवी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिप्ती देवी. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून दिप्तीने तिच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवलं. त्यामुळे आज ती लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे सतत हसतमुख असणारी दिप्ती कधी काळी नैराश्याच्या गर्ततेत अडकली होती. दिप्तीने स्वत: याविषयी सांगितलं असून या नैराश्यावर कशी मात मिळवली हेदेखी’ल सांगितलं.

दिप्ती तिच्या फिटनेसच्या बाबतीत कायम सजग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे ती तिचा जास्तीत जास्त वेळ जीम आणि योग करण्यात घालवत असते. विशेष म्हणजे याच योग करण्यामुळे ती नैराश्यासारख्या आजाराला सामोरी जाऊ शकली. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन असल्यामुळे या दिनानिमित्त तिने योग करण्याचं महत्त्व आणि त्यातून मिळणाऱ्या सकारात्मक उर्जेविषयी सांगितलं.

” तीन वर्षापूर्वी मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचले होते. सतत पॅनिक अटॅक्स, चिंता, नैराश्यग्रस्त मनस्थिती या सगळ्याचा परिणाम माझ्या शारीरिक आरोग्यावर झाला होता. त्यानंतर मी रिमाची भेट घेतली आणि तिच्याकडे योगाभ्यास सुरु केला. विशेष म्हणजे या योगाभ्यासामुळे माझ्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट बदल जाणवू लागले. मी सकारात्मकतेने विचार करु लागले. तसंच माझी पचनशक्ती वाढण्यापासून, चेहऱ्यावर आलेल्या ग्लोपर्यंत याचं सारं श्रेय रिमाला आहे, असं दिप्ती देवी म्हणाली.

“दिप्तीचा योग क्लासमधला पहिला दिवस मला आजही आठवतोय. तेव्हापासून आजपर्यंतचा तिचा योगाभ्यातला प्रवास सोप्पा नव्हता. आरोग्यविषयक तक्रारींशिवाय तिच्या शरीरात लवचिकता अजिबात नव्हती. पण तिने स्वत:वर मेहनत घेतली. त्यामूळे सकारात्मक बदलांकडे आपोआपच तिची वाटचाल सुरू झाली. खरं तर तीन महिन्यांच्या कालावधीतच तिच्यातले बदल हळूहळू दिसू लागले होते. प्रत्येकाच्याच आयुष्यात एक ‘बॅड फेज’ किंवा ‘लो फेज’ येते. पण त्यावर मात करून तुम्ही सशक्तपणे कसे उभे राहू शकता, हे नियमित योगाभ्यास करून दिप्तीने दाखवलंय. ती माझी विद्यार्थीने असल्याचा मला अभिमान आहे,” असं रिमा म्हणाली.

दरम्यान, दिप्ती गेल्या काही वर्षांपासून अष्टांग योगा ट्रेनर रिमा वेंगुर्लेकर यांच्याकडे योगचं प्रशिक्षण घेत आहे. फिटनेसकडे विशेष लक्ष देणारी दिप्ती ‘मला सासू हवी’,‘अंतरपाट’,‘परिवार’,‘बडे अच्छे लगते है’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 5:53 pm

Web Title: marathi actress deepti devi overcome depression ssj 93
Next Stories
1 मास्क लावून दिसला शक्तिमान, चाहत्यांना लवकरच मिळणार सरप्राइज
2 संजय लीला भन्साली यांनी सुशांतला ऑफर केले होते ४ चित्रपट?
3 करण जौहर वैतागला; टीकाकारांना टाळण्यासाठी शोधला ‘हा’ मार्ग
Just Now!
X