News Flash

नव्या वर्षात म्हणा ‘ये रे ये रे पैसा’

नव्या वर्षात प्रेक्षकांना संजय जाधव देणार खास भेट

ये रे ये रे पैसा

असं म्हणतात, एखाद्याला रडवणं सोपं आणि हसवणं फार कठीण. पण येत्या नववर्षात ही जबाबदारी उचलली आहे झी स्टुडिओज आणि संजय जाधवने. ‘दुनियादारी’ चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि संजय जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाच्या माध्यमातून संजय जाधव पुन्हा एकदा त्याच्या दिग्दर्शनाने प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना एक खास भेट देण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून झी स्टुडिओजने पाडला आहे. ‘नटरंग’, ‘टाईमपास’, ‘लोकमान्य’, ‘नटसम्राट’, ‘ती सध्या काय करते’ अशा दर्जेदार कलाकृती देणाऱ्या झी स्टुडिओजची निर्मिती असणारा ‘ये रे ये रे पैसा’ हा चित्रपट येत्या नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच ५ जानेवारी २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता संजय नार्वेकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हे चेहरे झळकणार असून, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत आणि तेजस्विनी पंडित हे कलाकारसुद्धा या चित्रपटातून नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात करणार आहेत.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. चित्रपटाची कथा आहे पाच माणसांची आणि त्यांच्या सोबत घडणाऱ्या गमतीदार गैरसमजाची. उमेश, तेजस्विनी, सिद्धार्थ, संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी म्हणजेच आदित्य, बबली, सनी, अण्णा आणि जान्हवी या पाच जणांच्या आयुष्यात घडणारी एक घटना त्यांना विचित्रप्रकारे एकमेकांसमोर आणते. आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणाने पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मागे पळत असताना होणाऱ्या भन्नाट गैरसमजांची आणि बनवाबनवीची रुपेरी पडद्यावर करण्यात आलेली मनोरंजनात्मक मांडणी म्हणजे ‘ये रे ये रे पैसा’.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2017 5:41 pm

Web Title: marathi director sanjay jadhav ye re ye re paisa to release in new year first week
Next Stories
1 …म्हणून रामदेव बाबांनी रिअॅलिटी शोमधील स्पर्धकाला भेट दिली गाय
2 अभिनेत्री रेखा आणि अमृता सुभाष यांना स्मिता पाटील स्मृती पुरस्कार प्रदान
3 VIDEO : बिग बींच्या नातीचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात’!
Just Now!
X