चीनमधून फैलाव झालेल्या करोना विषाणूने जवळपास सर्वच देशांमध्ये शिरकाव केला आहे. यात भारताचादेखील समावेश आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. या महामारीवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी देशात लॉकडाउनची घोषणा केली आहे. या लॉकडाउनचा आज ९ वा दिवस असून पंतप्रधान मोदींनी आज जनतेशीही व्हिडीओद्वारे संवाद साधला यावेळी त्यांनी पाच एप्रिल रोजी रात्री सर्व भारतीयांनी घरातील लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केलं. मोदींच्या भाषणानंतर जनतेमधून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचं पहायला मिळलं. मात्र यात अनेकांनी मोदींवर टीकास्त्रदेखील डागलं. मात्र पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्यांवर लोकप्रिय गायक सलील कुलकर्णीने निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्यांना सलील कुलकर्णीने  जाब विचारला आहे. ‘पंतप्रधान मोदींवर आज टीका करणारे दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमातील गर्दीविषयी आणि इंदूरमध्ये डॉक्टर आणि परिचारिकांवर हल्ला करणाऱ्यांविषयी का बोलत नाहीयेत. आता कुठे गेले ही टीका करारे लोकं, असं त्याने स्पष्ट शब्दांत विचारलं आहे. विशेष म्हणजे त्याने कोणाचंही नाव न घेतला हा टोला लगावला आहे.

‘मेणबत्ती लावून काय होणार वगैरे खरंय..पण आज ह्यावर एकदम तर्कशुद्ध बोलणारे विद्वान दिल्लीत हजारोंची गर्दी जमली,त्यांनी नंतर डॉक्टरांना मारलं ..इंदोरमध्ये डॉक्टर आणि नर्सेस वर हल्ला झाला तेव्हा इतके शांत का होते ? का त्यांनी नेमकी काल परवा fb war casual leave घेतली होती ? का त्यांना दोन दिवसात double झालेला नंबर आणि त्यामागचे कारण हे खटकलं नाहीये ? Really ?’

दरम्यान, सलील कुलकर्णीने फेसबुकच्या माध्यमातून ही पोस्ट शेअर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिवे लावताना कोणीही एकत्र यायचे नाही. सोशल डिस्टसिंग तोडायचं नाही.करोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टसिंग हा एकमेव उपाय आहे, असं सांगितलं. विशेष म्हणजे २२ मार्च रोजी जनता कर्फ्युदरम्यान अनेकांनी सोशल डिस्टसिंगचं उल्लंघन केलं होतं. त्यामुळे यावेळी मोदी यांनी जाणीवपूर्वक ही गोष्टी नागरिकांच्या लक्षात आणून दिली आहे.