News Flash

‘सुशांत प्रमाणे तुझाही मृत्यु होऊ शकतो’, सोशल मीडिया पोस्टवरून मोहितची पोलिसात तक्रार

मोहितने गोरेगाव पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.

मोहितने गोरेगाव पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. (Photo Credit : Sushanat Singh Rajput File Photo and Mohit Raina Instagram)

‘देवो के देव महादेव’ या मालिकेतून प्रकाश झोतात आलेला अभिनेता मोहित रैनाने चार जणांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोहित विषयी एक विचित्र दावा केला जातं आहे. याला पाहता मोहितने गोरेगाव पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. मोहितने ही तक्रार सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘सेव्ह मोहित’ या मोहिमेवरून केली आहे.

मोहित राना विषयी त्याची स्वयंघोषित शुभचिंतक सारा शर्माने सोशल मीडियावर ‘सेव्ह मोहित’ मोहीम ही चालवली होती. तिच्या म्हणण्यानुसार, मोहितच्या जिवाला धोका आहे. सुशांत सिंह राजपूतप्रमाणे मोहित रैनाचाही मृत्यू होऊ शकतो. हे पाहता स्वत: मोहित आणि त्याच्या कुटुंबाने पुढे येऊन ते सगळे अगदी ठणठणीत आहेत असे सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohit Raina (@merainna)

या घटनेनंतर मोहितने न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार, बोरिवली न्यायालयाने संबधित पोलिसांना मोहितचा जबाब नोंदवून तपास करण्याच्या सूचना दिल्या. तर, गोरेगाव पोलिसांना दिलेल्या जबाब मध्ये मोहितले सांगितले की त्याला सारा शर्मा आणि तिच्यासोबत परवीन शर्मा, आशिव शर्मा, मिथीलेश तिवारी हे त्रास दित आहेत.

आणखी वाचा : ‘राधे माँ’, यामी गौतमचा लग्नातील ड्रेस पाहून कलाकारांनी उडवली खिल्ली

मोहितच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या चौघांवर कलम ३८४ आयपीसी अंतर्गत गुन्हेगारी कट रचने, पोलिसांना चुकीची माहिती देणे, धमकी देणे आणि खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास गोरेगाव पोलिस करत आहेत.

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

‘देवो के देव महादेव’ या मालिकेसोबत मोहितने ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपट आणि ‘भौकाल’, ‘काफिर’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 7:45 pm

Web Title: mohit raina files complaint against 4 people for spreading rumours against him dcp 98
Next Stories
1 ‘शेरनी’मधील विद्याची भूमिका पाहता महिला वन अधिकाऱ्यांनी केले कौतुक
2 ‘रात्री झोपताना मुलांचा व्हिडीओ कॉल सुरु ठेवते’, श्वेता तिवारीने सांगितले कारण
3 ‘हिरोपंती-2’ च्या ‘त्या’ खास सीनचं रशियात होणार शूटिंग
Just Now!
X