News Flash

मनी हाइस्ट ५ : ‘हे एक मोठ युद्ध असेल..’, बर्लिन अर्थात पेद्रो अलोन्सोने उलगडला सस्पेन्स

लोकप्रिय वेब सीरिज 'मनी हाइस्ट'चा शेवटचा सिझन लवकरच होणार प्रदर्शित; पेद्रो अलोन्सोने मनी हाइस्टमध्ये बर्लिनची भूमिका साकारली

लोकप्रिय वेब सीरिज 'मनी हाइस्ट'चा शेवटचा सिझन लवकरच होणार प्रदर्शित ( Photo Credit : Lacasadepapel Instagram)

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सीरिज ‘मनी हाइस्ट’चा शेवटचा सिझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजच्या शेवटचा सिझनची चाहते उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. एवढंच नाही तर ‘मनी हाइस्ट’ या सीरिजमधल्या प्रत्येक अभिनेत्याने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. या सीरिजमध्ये बर्लिनची भूमिका साकारणारा अभिनेता पेद्रो अलोन्सोने नुकत्याच एका मुलाखतीत शेवटच्या सिझन हा चार भिंतीत असलेलं एक मोठ युद्ध असल्याचं सांगितलं आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार या मुलाखतीत पेद्रोने बर्लिन या भूमिके विषयी आणि जगात लोकप्रिय झालेल्या या वेब सीरिजचा भाग असल्याचा अनुभव सांगितला आहे. “कोणत्याही प्रोजेक्टवर काम केल्यानंतर शेवटी मी ते विसरण्याचा प्रयत्न करतो. पण हे खरं आहे की या सीरिजमुळे अनेक मोठ्या गोष्टी घडल्या आहेत. आणि हे असं असलं तरी मला असं वाटतं की, स्वतः पलीकडे जाऊन ज्याने हे काम सत्यात उतरवलं आणि जगासाठी हे करण्यात आलं. त्याने दरवाजा उघडला किंवा थोडासा उघडा केला आहे. आणि या सगळ्यात आपलं थोडंही योगदान असेल, तर मला वाटतं ते नेत्रदीपकच म्हणायला हवं,” असं पेद्रो म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pedro Alonso (@pedroalonsoochoro)

पेद्रोने पुढे सीरिजचा भाग असल्याचा त्याचा अनुभव सांगितला. पेद्रो म्हणाला,”मी एक अशी व्यक्ती आहे. ज्याने अशा वेळी सीरिजचे चित्रीकरण केले जेव्हा कोणत्याही छोट्या चुकीमुळे संपूर्ण सेटवर असलेल्या लोकांचे करिअर खराब होऊ शकते. आणि अजूनही जेव्हा मी अशा प्रकारचे सेट आणि कलाकृती पाहतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं.”

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

शेवटच्या सिझनबद्दल बर्लिनने एक गोष्ट सांगितली आहे. “आपण शेवटच्या सिझनमध्ये जे काही पाहणार आहोत ते सगळं मजेशीर आहे. कारण, मी जे पाहिलं त्यावरून आपण एक वॉर सीरिज बनवत आहोत पण ते पण सुद्धा चार भिंतींच्या आत. हा कोणता अॅक्शन सीक्वेन्स नाही तर, ही एक मोठी वॉर सीरिज आहे.”

आणखी वाचा : मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दिशाने पहिल्यांदा केली पोस्ट

पेद्रोने बर्लिनची भूमिका साकारली जो प्रोफेसरचा मोठा भाऊ आहे. या दोघांनी मिळून ‘रॉयल मिंट ऑफ स्पेन’ या बॅंकेत दरोडा टाकण्याची योजना आखली होती. मनी हाइस्टच्या दुसऱ्या सिझनच्या शेवटी बर्लिन आजारी असल्याते कळते. बर्लिनने त्याच्या साथीदारांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकला तेव्हा त्या क्रुर बर्लिनला पाहुन सगळे प्रेक्षक भावूक झाले होते.

आणखी वाचा : “पूर्वाश्रमीच्या पतीचे कुटुंबीय…”, पूजा बेदीने सांगितले चित्रपटसृष्टी सोडण्यामागचे कारण

‘मनी हाइस्ट ५’ हा सिझन ३ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिझनमध्ये १० एपिसोड असणार आहेत. तर याच सिझनचा दुसरा भाग हा २ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘मनी हाइस्ट’चा हा शेवटचा भाग असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 9:17 am

Web Title: money heist 5 berlin aka actor pedro alonso said it will be an epic war film dcp 98
Next Stories
1 मनोरंजन क्षेत्रातील संघटनांशी आज मुख्यमंत्र्यांचा संवाद
2 यामी गौतम विवाहबद्ध
3 ‘पंच’पुरते उरले विनोद…
Just Now!
X