04 March 2021

News Flash

मृण्मयी रमली ‘केसर’च्याआठवणीत

'फत्तेशिकस्त' चित्रपटात मृण्मयीने केसर ही भूमिका साकारली आहे.

महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावरा राज्य करणारी अष्टपैलू अभिनेत्री म्हणचे मृण्मयी देशपांडे. तिच्या अभिनय कौशल्याने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. २०१९ मध्ये ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात ती केसर या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. आता पुन्हा ही केसर लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. त्या निमित्ताने मृण्मयीने केसर बद्दलच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

केसर या भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली, शिवकालीन भाषा आणि तलवार बाजीचे प्रशिक्षण देखील घेतले. ‘फत्तेशिकस्त’मधली ही केसर आता झी टॉकीजवर प्रेक्षकांच्याभेटीस येणार आहे. १६ ऑगस्टला या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर होणार आहे. त्या निमित्ताने मृण्मयीने केसर बद्दलच्या काही आठवणी शेअर केल्या.

“फर्जंदनंतर लगेचच दिग्पालने फत्तेशिकस्तची जुळवा जुळव सुरु केली. मला माहित होतं की केसरची भूमिका मला परत करायला मिळणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक होते. त्याने मला सांगितले होते की फत्तेशिकस्त मधील केसर थोडी वेगळी असणार आहे आणि त्यामुळे उत्सुकताअजुनच वाढली होती. फत्तेशिकस्त मधील केसर आणखी नवखी होती. तिने एखादी चूक जर केली तर त्याची किंमत तिला एकटीलाच नाही तर सर्वानाच भोगावी लगणार होती. अशा परिस्थितीमध्ये बहिर्जी नाईकांनी तिला सहभागी करून घेतल होते. फत्तेशिकस्तमधील केसरची तयारी तशी फर्जंद पासूनच सुरु झाली होती. मी संहिता वाचल्यावर त्या भूमिकेची गाभा मला कळाला” असे मृण्मयी म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 2:35 pm

Web Title: mrunmayee deshpande speaking about kesar chracter in fateshikasht movie avb 95
Next Stories
1 सुशांत मृत्यू प्रकरण: संजय राऊत यांच्यावर सुशांतचं कुटुंब ठोकणार मानहानीचा दावा
2 इब्राहिम अली खान शोधतोय हरवलेली बायको; गंमतीशीर व्हिडीओ होताय व्हायरल…
3 “..आणि पहिल्यांदा मुंबईत पाऊल ठेवले”, सतीश कौशीक यांनी शेअर केला फोटो
Just Now!
X