टायगर श्रॉफच्या आगामी ‘मुन्ना मायकल’ सिनेमातले ‘बेपरवाह’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच टायगर म्हणतो की, तुमच्यात आणि माझ्यात एका गोष्टीचे साम्य आहे ती म्हणजे आपण सर्वच स्वप्न पाहतो. पण ती स्वप्न पूर्ण करु शकतो का? यानंतर गाणं सुरू होतं आणि टायगरचा अफलातून डान्स सर्वांचीच मनं जिंकतो. टायगरच्या डान्सशिवाय या गाण्यात निधी अग्रवाल आणि नवाजुद्दीन सिद्दीकीमधील प्रेमसंबंधही दाखवण्यात आले आहेत. वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या या तीन व्यक्ती आपल्या स्वप्नांचा कसा पाठलाग करतात ते दाखवण्यात आलं आहे.

…म्हणून अर्जुन कपूर अजूनही ‘सिंगल’

आपण पाहिलेली स्वप्न जेव्हा तुटतात तेव्हा साहजिकच प्रत्येकालाच दुःख होतं. कदाचित यामुळेच एका दृश्यात नवाज, टायगरवर बंदूक रोखून रागात त्याला जाब विचारताना म्हणतो की, ‘तुला मी माझा भाऊ मानलेला. पण तुला काय वाटलं तू माझं स्वप्न मोडशील.’ या गाण्यातून टायगर आणि नवाजची मैत्री दाखवण्यात आली आहे. पण नंतर आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासात दोघांमध्ये दरी निर्माण झालेलीही या गाण्यात दिसते. निधी, नवाज आणि टायगर दोघांसोबत फ्लर्ट करताना दिसते. त्यामुळे नक्की तिचं प्रेम कोणावर असतं हे तर सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल. या गाण्यातून टायगरने मायकल जॅक्सनला एक प्रकारची मानवंदनाच दिली आहे.

टायगरने एका मुलाखतीत सांगितले होते की, या गाण्यासाठी त्याने एवढी मेहनत घेतली आहे की, गाण्याच्या प्रत्येक सीननंतर त्याला उलटी व्हायची. हे गाणे त्याचे आतापर्यंतच्या गाण्यांपैकी सर्वात कठीण गाणे आहे. ‘मला कॅमेऱ्यासमोर काहीच दिसायचे नाही. पण लाइट्समुळे मी एका वेड्या मुलासारखा डान्स करायचो.’ या गाण्याला सिद्धार्थ बसरुर आणि नंदिनी देब यांनी आवाज दिला आहे. तर कुमारने याचे बोल लिहिले आहेत. शब्बीर खानच्या दिग्दर्शनात साकार झालेला हा सिनेमा येत्या २१ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

सर्जरीदरम्यान झाला मृत्यू, १०० हून जास्त केल्या प्लॅस्टिक सर्जरी