News Flash

‘इंदौरी इश्क’ वेब सीरिज प्रदर्शित!

ही ९ भागांची सीरिज आहे.

१० जून रोजी प्रदर्शित झाली आहे.

अभिनेत्री मीरा जोशीची ‘इंदौरी इश्क’ ही वेब सीरिज आज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये आधुनिक काळातील प्रेमकहाण्यांमध्ये आढळणारी निष्ठा आणि व्यभिचार यांचा खेळ अत्यंत अनोख्या रीतीने दाखवण्यात आला आहे. या सीरिजचे दिग्दर्शन समित कक्कड यांनी केले आहे. ही सीरिज एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली असून ९ भागांची आहे. ही एक अतिशय ‘हटके’ प्रेमकहाणी आहे.

‘इंदौरी इश्क’ या सीरिजमध्ये कुणालची प्रेमकहाणी मांडण्यात आली आहे. त्याची प्रेयसी ताराने केलेला त्याचा प्रेमभंग आणि त्याचे परिणाम याने या प्रेमकहाणीची उत्कंठा आणि रंगत वाढवत नेली आहे. काही दिवसांपूर्वी सीरिजचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. त्याला तरुण वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

समित यांनी या पूर्वी ‘आश्चर्यचकित’, ‘आयना का बायना’ आणि ‘हाफ टिकिट’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अत्यंत वास्तवदर्शी मांडणी आणि अप्रतिम तंत्रकौशल्य यामुळे त्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी समित यांनी ‘इंदौरी इश्क’ची निवड केली असून तीव्र भावना, हृदय पिळवटून टाकणारी वेदना आणि प्रेक्षकांच्या काळजाला हात घालेल असं संगीत याने ही मालिका त्यांनी अत्यंत लक्षवेधी केली आहे.

समित यांचे ‘आयना का बायना’ आणि ‘हाफ टिकिट’ सारखे आधीचे चित्रपट जगभरातल्या नामवंत चित्रपट महोत्सवांचा दौरा करून आले आहेत. आता त्यांची ‘इंदौरी इश्क’ ही वेबी सीरिज प्रदर्शित झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 7:01 pm

Web Title: mx player series indori ishq released avb 95
Next Stories
1 जेनेलियासोबत वेळ घालवत असलेल्या रितेशला जेव्हा कळाले की…
2 अभिनेत्री होण्यापूर्वी परिणिती चोप्रा अनुष्का शर्मासाठी करायची हे काम
3 ‘रात्रीस खेळ चाले’मधील दत्ताला पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली…
Just Now!
X