News Flash

“उदय चोप्रा आणि मी पाच वर्ष…”; नरगिस फाकरीने अखेर सोडलं मौन

२०१४ सालामध्ये नरगिस फाकरी आणि उदय चोप्रा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या

Nargis-Uday
(File Photo)

बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाकरीने पहिल्यांदाच उदय चोप्रासोबत असलेल्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केलाय. ईटीटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नरगिसने बऱ्याच वर्षांनंतर तिच्या आणि उदय चोप्राच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे. काही वर्षांपूर्वी उदय चोप्रा आणि नरगिस फाकरीच्या अफेअरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. मात्र दोघांनीदेखील जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती.

नरगिस फाकरीने नुकतीत ईटीटाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत “उदय आणि मी 5 वर्षे एकमेकांना डेट करत होतो, भारतात भेटलेला तो सर्वात सुंदर व्यक्ती होता.”असं ती म्हणाली. तर अनेकांनी रिलिशनशिपबद्दल जाहीरपणे न बोलण्याचा सल्ला दिला होता ज्याबद्दल आता मात्र खूप खंत वाटत असल्याचं नरगिस म्हणाली.

हे देखील वाचा: …म्हणून महत्वाच्या मुद्द्यांवर सलमान, शाहरुख आणि आमिर खान बोलणं टाळतात; नसीरुद्दीन शाह यांचा खुलासा

या मुलाखतीत नरगिस म्हणाली, “ते सुंदर नातं मी जगासमोर लपवून ठेवल्याची मला खंत वाटतेय. त्यावेळी मी खरतंर एखाद्या उंच पर्वतांवर जाऊन मी एका खूप सुंदर व्यक्तीसोबत असल्याचं सगळ्यांना ओरडून सांगायला हवं होतं. इंटरनेट आणि सोशल मीडिया हे सर्व फेक आहे. इथं सत्य काय हे लोकांना कळत नाही. आपण बऱ्याचदा चुकीच्या आणि वाईट लोकांना देखील आदर्श मानू लागतो.” असं नरगिस म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

हे देखील वाचा: सिनेमा चालले नसते तर पार्ट्यांमध्ये ‘हे’ काम करण्यासाठी तयार होता आयुष्मान खुराना

२०१४ सालामध्ये नरगिस फाकरी आणि उदय चोप्रा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. उदयासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नरगिस जस्टिन संटोसला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2021 5:32 pm

Web Title: nargis fakari open ups on relationship with uday chopra after years kpw 89
Next Stories
1 कलाकारांवर टीका करतेवेळी थोडं तरी तारतम्य बाळगा, दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रिया बेर्डेंचा संताप
2 ठरलं! करीना नाही तर कंगना साकारणार सीतेची भूमिका
3 Video : गडद अंधार, चमकत्या वीजा अन्… ‘लपाछपी’च्या हिंदी रिमेकचा थरारक प्रोमो प्रदर्शित
Just Now!
X