News Flash

पहिल्यांदाच नवाजुद्दीन, तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी दिसणार या मराठी चित्रपटात

चित्रपटाचा शुभारंभ

सामाजिक विषयावरील 'अ ब क' या चित्रपटाचा शुभारंभ

सामाजिक विषयावरील ‘अ ब क’ या चित्रपटाचा शुभारंभ

ग्रॅव्हेटी एण्टरटेन्मेन्ट व गोल्डन ग्लोब प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित ‘अ ब क’ या मराठी चित्रपटाचा शुभारंभ अभिनेता सुनील शेट्टी आणि अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या प्रसंगी ‘लायन’ फेम सनी पवार याचे आजोबा भीमराव पवार, चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार शेडगे, लेखक आबा गायकवाड, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटाचे निर्माते मिहीर सुधीर कुलकर्णी आदी या प्रसंगी उपस्थित होते.

वाचा : शाहरुख, नवाजुद्दीन अडचणीत; ५०० कोटींच्या घोटाळ्यात उघड झाले नाव

ग्रॅव्हेटी ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. ग्रॅव्हेटी एण्टरटेन्मेन्ट या पुढे सामाजिक विषयावरील दर्जेदार चित्रपटाची निर्मिती करून आपला समाजसेवेचा वसा कायम ठेवणार आहे, असे मत निर्माते मिहीर कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सध्या मराठी चित्रपट उत्तुंग यश संपादित करत आहे. या चित्रपटात मीसुद्धा काम करतोय. मला मराठी चित्रपट खूप आवडतात. मी उत्तम मराठी बोलतो.  ‘अ ब क’ हा चित्रपट खूप यश संपादन करेल याची मला खात्री आहे, अशी भावना अभिनेता सुनील शेट्टी याने व्यक्त केली.

वाचा : अक्कासाहेबांच्या ‘पुढचं पाऊल’ला पूर्णविराम

सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ‘अ ब क’ सारख्या वेगळ्या विषयावरील चित्रपटाची आज गरज आहे. मुला मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींना ही दर्जात्मक शिक्षण दिले पाहिजे. अशी भावना व्यक्त करत अमृता फडणवीस यांनी मिहीर कुलकर्णी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. ‘अ ब क’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकुमर शेडगे करणार असून चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद आबा गायकवाड यांचे आहेत. तर संगीत राहुल रानडे यांचे आहे. या चित्रपटात सनी पवार सह नवाजुद्दीन सिद्दकी, तमन्ना  भाटिया, सुनील शेट्टी, तन्वी सिन्हा आदी दिग्ग्ज कलावंत काम करणार आहेत.

या चित्रपटाचे वैशिष्टय असे की हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू अशा पाच भाषेत निर्माण होणार आहे. या चित्रपटासाठी अमृता देवेंद्र फडणवीस पार्श्वगायण करणार असून चित्रपटाचे चित्रिकरण १५ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 5:10 pm

Web Title: nawazuddin siddiqui suniel shetty sunny pawar tamannaah bhatia first time in marathi movie a b c
Next Stories
1 …म्हणून सनी लिओनीला सलमान सर्वात जास्त आवडतो
2 अक्षयला इम्प्रेस करण्यासाठी तिने केला हा आटापिटा..
3 गोविंद निहलानी यांचा ‘ती आणि इतर’ लवकरच