News Flash

लेडी सुपरस्टार नयनताराच्या ‘नेत्रिकन’चा ट्रेलर रिलीज; युट्यूबवर होतोय ट्रेंड

थ्रीलर फिल्म 'नेत्रिकन' चित्रपटासाठी प्रेक्षक अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. अखेर आज याचा ट्रेलर रिलीज केलाय.

nayanthara-film-netrikann-trailer-released
(Photo: Instagram/disneyplushotstar)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेडी सुपरस्टार नयनताराचा बहूप्रतिक्षित ‘नेत्रिकन’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय. हा ट्रेलर रिलीज होताच तो युट्यूबवर ट्रेंड सुद्धा होऊ लागलाय. हा चित्रपट लवकरच डिज्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. काही दिवसांपूर्वीच ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारने या चित्रपटाचं पोस्टर देखील शेअर केलं होतं. त्यानंतर चित्रपटाचा सस्पेन्स आणखी वाढवत आज ट्रेलर रिलीज केलाय.

नयनतारा ही तमिळ अभिनेत्री असली, तरी तिचे टॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. तिच्या ‘नेत्रिकन’ चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच हा चित्रपट कधी येणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. प्रेक्षकांची ही उत्सुकता पाहून ‘नेत्रिकन’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केलाय. जबरदस्त सस्पेन्स असलेल्या या ट्रेलरमध्ये अभिनेत्री नयनतारा हिची भूमिका खूपच धमाकेदार दिसून येतेय. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच या ट्रेलरने युट्यूबवर धुमाकूळ घालायला सुरूवात केलीय.

आणखी वाचा : Sanjay Dutt Birthday: पाहा बॉलिवूडच्या खलनायकाचे कधीही न पाहिलेले फोटोज

लेडी सुपरस्टार नयनतारा स्टारर ‘नेत्रिकन’ हा चित्रपट येत्या १३ ऑगस्ट रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री नयनताराने एका अंध महिलेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय. ही एक थ्रीलर फिल्म असून एका सीरियल किलरच्या अवती भवती फिरणारी कहाणी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट गेल्याच वर्षी रिलीज होणार होता. मात्र, करोनाच्या लाटेमुळे हा चित्रपट रिलीजसाठी प्रतिक्षेत ठेवण्यात आला होता. अखेर करोना परिस्थिती पाहता मेकर्सनी हा चित्रपट येत्या १३ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अखेर प्रेक्षकांची या चित्रपटासाठीची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.

‘रायन पिक्चर्स’ या बॅनरखाली रिलीज होणाऱ्या ‘नेत्रिकन’चे प्रोड्यूसर विग्नेश शिवनची ही पहिली निर्मिती असणार आहे. तर मिलिंद राऊ हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट ‘ब्लाइंड’ नावाच्या एका कोरियन चित्रपटाचा रिमेक असल्याचं सांगण्यात येतंय. हा एक तमिळ थ्रीलर चित्रपट असून यात एक अंध महिला हिट-अ‍ॅण्ड-रन प्रकरणात साक्ष देते आणि त्यामूळे हत्यारे आणि तिच्यातला रंगणारा रंजक सामना या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. तसंच अभिनेत्री नयनतारा या चित्रपटात पोलिस अकादमीमधल्या एका कॅडेटच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात एका कार अपघातात ती आपले डोळे गमावते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2021 5:16 pm

Web Title: nayanthara film netrikann trailer released video trending on youtube prp 93
Next Stories
1 “टोमॅटो कसे दिले?”; “त्या” फोटोमुळे अभिनेत्री टिना दत्ता ट्रोल
2 Video: ‘ओ शेठ’ या गाण्याने सोशल मीडियावर केला आहे कल्ला…जाणून घ्या गाण्यामागची गोष्ट
3 सिनेमा चालले नाहीत तर मी पार्ट्यांमध्ये गाणं गायचं आणि डान्स करायचं ठरवलं होतं”; आयुष्यमान खुरानाचा खुलासा
Just Now!
X