नेहा कक्कर ही बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते. नेहा गाण्यांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी देखील तिने असाच एक गंमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहे. इंडियन आयडॉलच्या सेटवरील हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील खळखळून हसाल.
View this post on Instagram
नेहानं इंडियन आयडॉलच्या सेटवरील एक ब्लूपर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत संगीतकार हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी दिसत आहेत. तिघेही सेटवर स्लो मोशनमध्ये रॅम्पवॉक करत होते. तेवढ्यात हिमेशनने एक उडी मारली अन् तो नेहाच्या अंगावर पडला. या दरम्यान नेहाला त्याचं कोपर लागलं. या अनपेक्षित प्रकारामुळे नेहाच्या चेहऱ्यावर उमटलेले हावभाव पाहून स्टेजवर एकच हास्यकल्लोळ झाला. हा आहे माझा सर्वात क्यूट व्हिडीओ अशा आशयाची कॉमेंट लिहून नेहाने या व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.