News Flash

‘मेरे रश्के कमर’ गाण्यामुळे नेहा कक्करची बहीण सोनू कक्कर ट्रोल, नेटकरी म्हणाले…

इंडियन आयडलच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांनी सोनूला गाणं गाण्याची विनंती केली.त्यानंतर सोनू कक्करने नुसरत फतेह अली खान यांचं लोकप्रिय "मेरे रश्के कमर" गाणं गायलं.

sonu-kakkar-neha-kakkar
(photo-instagram@sonukakkarofficial)

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो ‘इंडियन आयडल’ म्हणजे संगीत प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. या शोमुळे आजवर अनेक गायकांना योग्य मंच मिळाल्याने प्रसिद्धी मिळाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा शो अनेक कारणांमुळे चर्चेत आला आहे. या शोमधील स्पर्धक आणि जजेस कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत येत आहेत. नुकतच या शोमधील जजेच नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता या शोमध्ये गेस्ट म्हणून आलेल्या नेहा कक्करची बहीण सोनू कक्करला ट्रोल करण्यात आलंय.

गेस्ट म्हणून आलेल्या सोनू कक्करने या शोमध्ये स्पर्धकांसोबत काही गाणी गायली. यावेळी सोनू कक्करने गायलेल्या एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच सोनूला नेटकऱ्यांनी चांगलचं ट्रोल केलंय. इंडियन आयडलच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांनी सोनूला गाणं गाण्याची विनंती केली. त्यानंतर सोनू कक्करने नुसरत फतेह अली खान यांचं लोकप्रिय ठरलेलं “मेरे रश्के कमर” गाणं गायलं. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. मात्र नेटकऱ्यांना सोनूने गायलेलं हे गाणं पसंतीस उतरलेलं नाही. त्यामुळे सोनूवर ट्रोलर्सनी निशाणा साधला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Indian idol (@indianidol14)

हे देखील वाचा: “नानू हलवाई ते नानू जलवाई”; आदित्य नारायणच्या ट्रान्सफॉर्मेशन लूकवर विक्रांत मेस्सीची मजेशीर कमेंट

सोनू कक्करचं गाणं ऐकून एक युजर म्हणाला, “सगळ्यांचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे पैसे कापा. यापेक्षा तर ओरिजनल गाणं वाजवलं असतं तर बरं झालं असतं.” तर दुसरा युजर म्हणाला, “गाण्याची चांगलीच इज्जत काढली. नुसरत साहेबांच्या आत्म्याला रडू आलं असेल, त्यांचा आत्मा दुखावला गेला असेल.” तर आणखी एक युजर म्हणाला, “याहून चांगलं तर रानू मंडल गातात.” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी सोनू कक्करच्या परफॉर्मन्सवर नाराजी व्यक्त केली.

(photo-instagram@indianidol14)

गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडलचं सुरू असलेलं पर्व सतत वादाच्या भोवऱ्यात सापडतं आहे. प्रेक्षकांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी या शोच्या निर्मात्यांसह जजेसवर टीका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 12:08 pm

Web Title: neha kakkar sister sonu kakkar troll after her rask ke kamar song indian idol video goes viral kpw 89
Next Stories
1 ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चित्रपट येणार? आसित मोदी म्हणाले..
2 ‘कमी वयात झालं होतं लग्न; एकवर्ष ही टिकला नाही संसार’, नीना गुप्ता यांचा खुलासा
3 Video: सलमान लग्न कधी करणार? सलीम खान म्हणाले…
Just Now!
X