03 December 2020

News Flash

Videos : ‘मिले हो तुम हमको..’; स्वत:च्या लग्नात नेहा कक्करने गायलं गाणं, केला अफलातून डान्स

पाहा नेहाच्या लग्नातील व्हिडीओ..

प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने गायक रोहनप्रीत सिंगशी २४ ऑक्टोबर रोजी दिल्लीत लग्नगाठ बांधली. आनंद कारज पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला नेहा व रोहनप्रीतचे कुटुंबीय व मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. लग्नानंतर पंजाबमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. नेहाच्या लग्नाचे विविध फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

विधींसाठी नेहा व रोहनप्रीतच्या पोशाखात गुलाबी रंगसंगती पाहायला मिळाली. रोहनप्रीतने गुलाबी रंगाची शेरवानी तर नेहाने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. त्यानंतरच्या कार्यक्रमासाठी नेहाने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. स्वत:च्या लग्नात नेहाने रोहनप्रीतसाठी ‘मिले हो तुम हमको’ हे तिचं प्रसिद्ध गाणं गायलं आणि त्यानंतर दोघांनी मिळून डान्ससुद्धा केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pallavi (@neheart_pallavi) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Pallavi (@neheart_pallavi) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Pallavi (@neheart_pallavi) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

रोहनप्रीत सिंगसुद्धा गायक असून ‘मुझसे शादी करोगे’ या रिअॅलिटी शोमध्ये तो झळकला होता. या शोमध्ये त्याने शेहनाज गिलला लग्नासाठी विचारले होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्याने आणि नेहाने एका अल्बममध्ये एकत्र काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 9:35 am

Web Title: neha kakkar ties the knot with rohanpreet singh in delhi ssv 92
Next Stories
1 अजय विसरला होता लग्नाची तारीख, अशी होती काजोलची प्रतिक्रिया
2 नवमाध्यमांच्या लाटेवरचे नवे चेहरे
3 तुषारचा लक्ष्मी बॉम्ब 
Just Now!
X