News Flash

स्वदेशीचा जागर करणाऱ्या कंगनाला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले,..

नव्या ट्विटमधला विरोधाभास दाखवून दिला

अभिनेत्री कंगना रणौत सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावरुन ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेते. यावेळी तिने एक ट्विट केलं आहे. आता त्यामुळे वाद जरी उद्भवला नसला तरी नेटकऱ्यांनी मात्र तिच्या या ट्विटमधला आणि प्रत्यक्ष वागण्यातला विरोधाभास तिला दाखवून दिल्याचं दिसत आहे.

कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नुकतंच एक ट्विट केलं आहे. त्याचबरोबर तिने स्वतःचे पिवळ्या साडीतले काही फोटोही पोस्ट केले आहेत. यातून ती ‘व्होकल फॉर लोकल’ या चळवळीला पाठिंबा देताना दिसत आहे. तसा हॅशटॅगही तिने आपल्या पोस्टमध्ये दिला आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, “जर तुमचं तुमच्या देशावर प्रेम असेल, तर तुम्ही राष्ट्रप्रेमी आहात. जर तुम्ही तुमच्या देशाप्रती कृतज्ञ असाल आणि तुमची प्रत्येक कृती तुमच्या देशाच्या भल्यासाठी असेल, तुम्ही खर्च करता तो प्रत्येक रुपया देशाच्या भल्यासाठी खर्च होत असेल आणि त्यामुळे तुमच्या देशातल्या नागरिकांचा फायदा होत असेल तर मात्र तुम्ही सर्वोत्तम राष्ट्रभक्त(अल्ट्रानॅशनलिस्ट) आहात.”

तिच्या या ट्विटवर कमी वेळात भरपूर प्रतिसाद आले आहेत. तिच्या या पोस्टवरुन काही जणांनी तिला ट्रोलही केलं आहे. याचं कारण म्हणजे या फोटोंमध्ये दिसणारी तिची पर्स. काही जणांनी तिची ही पर्सच परदेशी बनावटीची असल्याचं ट्विट केलं आहे. एका युजरने या पर्सचा आणि तिच्या मूळ उत्पादनाबद्दलची माहिती देणारा एक फोटो पोस्ट करत तिला टोमणा मारला आहे की, कंगना तूच खरी देशभक्त आहेस आणि भारताला आत्मनिर्भर बनवत आहेस.

तर एक युजर म्हणते, “हो आम्ही आमची सगळे पैसे अंबानी, अदानीला आणि तुझ्या XYZ सुरक्षेसाठी देत आहोत.”

तर काही जणांना वाटत आहे की, ती तिच्या साडीबद्दल बोलत आहे.

कंगना अनेकदा आपल्या ट्विट्सवरुन वाद ओढवून घेत असते. नेटकऱ्यांमध्ये तिचे हे ट्विट्स कायमच चर्चेचा विषय ठरतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 11:23 am

Web Title: netizens trolled kangana ranaut for her vocal for local vsk 98
Next Stories
1 १८ क्रू मेंबर्स पाठोपाठ ‘डान्स दीवाने ३’च्या परिक्षकाला करोनाची लागण
2 “ये क्या हो रहा है भाई…”, अमिताभ बच्चन यांची गुगली, चाहते कोड्यात!
3 “अक्षय कुमारही गुपचूप फोन करतो”, कंगना रणौतचा ‘मूव्ही माफियां’वर पुन्हा निशाणा
Just Now!
X