19 September 2020

News Flash

निर्मल सोनी नवे ‘डॉ. हाथी’!

'तारक मेहता...'चे निर्माते असितकुमार मोदी या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. पुढील आठवड्यापासून निर्मल नव्या हाथीच्या रुपात मालिकेत दिसणार आहे.

अखेर डॉक्टर हाथी यांच्या भूमिकेसाठी अभिनेता निर्मल सोनी यांचं नाव निश्चित करण्यात आले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सर्वात प्रसिद्ध मालिकेत डॉक्टर हाथीची भूमिका साकारणाऱ्या कवी कुमार आझाद यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. मालिकेतील त्यांची जागा भरून न निघणारीच. पण असं म्हणतात ना ‘शो मस्ट गो ऑन’ त्याचप्रमाणे मालिकेतील कलाकारांनी चित्रिकरण सुरूच ठेवलं. पण, कवी कुमार आझाद यांच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली होती. ही जागा भरून काढण्यासाठी ‘तारक मेहता…’चे निर्माते असितकुमार मोदी या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते.

अखेर डॉक्टर हाथी यांच्या भूमिकेसाठी अभिनेता निर्मल सोनी यांचं नाव निश्चित करण्यात आले आहे. निर्मल सोनी यांनी काही काळासाठी मालिकेत डॉ. हाथी यांची भूमिका साकारली होती. पुढील आठवड्यापासून निर्मल नव्या हाथीच्या रुपात मालिकेत दिसणार आहे. मालिकेतील ‘डॉ. हाथी’ या व्यक्तीरेखेला पूर्णविराम देता येणार नसल्यामुळेच गेल्या दीड महिन्यापासून नव्या अभिनेत्याच्या शोधात निर्माते होते. अखेर ही भूमिका आता निर्मल सोनीच साकारणार असल्यावर शिक्कामोहर्तब झालं आहे.  ९ जूनला कवी कुमार आझाद यांच निधन झालं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 2:45 pm

Web Title: nirmal soni to play new dr hathi in taarak mehta ka ooltah chashmah
Next Stories
1 अभय -दिप्ती ठरले संजय जाधवसाठी ‘लकी’
2 ‘बिग बॉस’च्या वादग्रस्त घरात चालणार श्रीसंतची खेळी
3 भारतात होणाऱ्या ब्रायन अ‍ॅडम्सच्या कन्सर्टमध्ये प्रियांका आणि ए.आर. रेहमानचाही सहभाग
Just Now!
X