News Flash

नोरा फतेहीने शेअर केला नव्या वर्षातील पहिला व्हिडीओ, सोशल मीडियावर चर्चेत

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आपल्या डान्सच्या मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोरा ही ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमुळे प्रकाश झोतात आली. नोराचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण सध्या एका वेगळ्या व्हिडीओसाठी ती चर्चेत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नोरा फोटोशूट करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नोरा फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. दरम्यान तिने लाँग ड्रेस परिधान केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी नोराच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नवीन वर्षातील नोराचा हा पहिला व्हिडीओ आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ‘क्रेझी इन लव्ह’ हे गाणे सुरु आहे. नोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

काही दिवसांपूर्वीच नोराचा गुरु रंधावासोबत एक नवा अल्बम ‘ नाच मेरी रानी’ लाँच झाला होता. या अल्बमधील नोराचा डान्स पाहण्यासारखा होता. हा अल्बम यूट्यूबवर सुपरहिट ठरला होता. ‘नाच मेरी रानी’ हा अल्बम यूट्यूबवरील सर्वाधिक पाहिला गेलेला अल्बम ठरला होता. या अल्बमला जवळपास २० कोटी व्ह्यूज होते. नोरा आणि गुरु रंधावा यांची केमिस्ट्री या अल्बममध्ये पाहायला मिळाली होती. हे गाणे तानिष्क बाग्ची यांनी लिहिले आहे. तसेच हे गाणे गुरु रंधावा आणि निकिता गांधी यांनी गायले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 11:32 am

Web Title: nora fatehi shared her first instagram video of 2021 avb 95
Next Stories
1 ‘शेवटी विजय त्याचाच होतो, जो…’; करण जोहरची ‘ही’ पोस्ट होते व्हायरल
2 रोहित शेट्टी करणार डिजिटल विश्वात पदार्पण
3 LGBTQ विषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर निशिगंधा वाड यांनी मागितली माफी
Just Now!
X