News Flash

मार्वल स्टुडिओच्या ‘मिस मार्वल’मध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान झळकणार?; नेटकऱ्यांमध्ये चर्चा

'मिस मार्वल' च्या IMDb पेजवर मुख्य कलाकारांच्या यादीत फवाद खानचं नाव झळकू लागल्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे.

(photo-instagram@fawadkhan81)

‘जिदंगी गुलजार’ है या पाकिस्तानी मालिकेमधुन ओळख मिळालेला अभिनेता फवाद खानला भारतातही मोठी प्रसिद्धी मिळाली. ‘ए दिल है मुश्किल’, ‘कपूर अ‍ॅन्ड सन्स’, ‘खूबसूरत’ अशा अनेक बॉलिवूड सिनेमांमधून फवादने भारतीय प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं. खास करून तरुणींमध्ये फवाद खानची मोठी क्रेझ होती. फवादच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे.

एका वृत्तानुसार फवाद खान हॉलिवूडच्या मार्वल स्डुडिओजच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. एका वृत्तानुसार आयरन मॅन, ब्लॅक विडो, कॅप्टन अमेरिका अशा सुपुरहिरोज सीरिजच्या निर्मितीनंतर आता मार्वल स्टुडिओ लवकरच ‘मिस मार्वल’ ही टीव्ही सीरिज घेऊन येत आहे. या सीरिजमध्ये फवाद खान मुख्य भूमिकेत झळकणार अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

‘मिस मार्वल’ च्या IMDb पेजवर मुख्य कलाकारांच्या यादीत फवाद खानचं नाव झळकू लागल्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. कलाकारांच्या या यादीत फावद खानचा फोटो आणि नाव दिसून येतंय. या सीरिजमध्ये त्याच्या भूमिकेचं नाव ‘हसन’ असेल असं यात नमूद करण्यात आलंय.

fawad-khan-imdb-miss-marvel (photo-IMDb page)

हे देखील वाचा: लग्न न करताच झाली आई; टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

‘मिस मार्वल’ ही एका पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन तरुणीची कहाणी आहे जिचं नाव कमला खान असं आहे. कमला ही एक सुपरहिरो आहे जी कॅप्टन मार्वलची मोठी फॅन आहे आणि त्याच्या प्रेमात आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री इमान व्हेलानी कमाला ही मुख्य भूमिका साकारणार आहे. आदिल अल अरबी, बिलाल फल्लाह, शर्मिन ओबेद-चिनॉय आणि मीरा मेनन या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत.

‘मिस मार्वल’ या सीरिजमध्ये फवाद खानसोबतच सागर शेख, मोहन कपूर, अरामिस नाइट, मॅट लिंट्झ हे कलाकार झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 12:51 pm

Web Title: pakistani actor fawad khan will be part of marvel studios miss marvel series news goge viral kpw 89
Next Stories
1 सोशल मीडियावर वजनाबद्दल बोलणारे, विचारणारे आहेतच – अन्विता फलटणकर
2 ‘साराभाई’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन
3 यामी गौतम पाठोपाठ ‘ये जवानी…’मधील ‘लारा’ने केले लग्न
Just Now!
X